Join us
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनीने पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट, म्हणाला, "तुमच्या कठीण काळात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 19:19 IST

1 / 7
मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम हंक अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गश्मीरने अभिनय क्षेत्रात नशीब आजमावलं. मराठीबरोबरच त्याने हिंदीतही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयाबरोबरच गश्मीर त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतो.
2 / 7
गश्मीरचे वडील रवींद्र महाजनी हेदेखील सुप्रसिद्ध अभिनेते होते. १५ जुलैला त्यांचं निधन झालं. तळेगाव येथील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. ते कुटुंबापासून दूर एकटेच राहत होते. त्यांच्या निधनानंतर गश्मीर व त्याच्या कुटुंबीयांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. गश्मीरने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत ट्रोलर्सला सडेतोड उत्तरही दिलं होतं.
3 / 7
वडिलांच्या निधनानंतर आता पहिल्यांदाच गश्मीरने पोस्ट शेअर केली आहे. गश्मीरने त्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याने पांढऱ्या रंगाचं डिझायनर शर्ट आणि पँट परिधान केल्याचं दिसत आहे. गश्मीरने त्याच्या हँडसम लूकमध्ये फोटोसाठी पोझही दिल्या आहेत.
4 / 7
गश्मीरने या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “हास्य...खाली पाडणाऱ्यांवर हसत आहे. हास्य हा सगळ्यात चांगला कमबॅक आहे. रात्री आपण चंद्र पाहण्यासाठी आकाशात बघतो...पण तो काळ्या ढगांनी झाकलेला असतो. मी त्याच्याकडे बघून हसलो आणि आभाळांनी माझ्यावर मेघांचा वर्षाव केला. हास्य तुमच्या कठीण काळात बदल घडवते,” असं कॅप्शन गश्मीरने दिलं आहे.
5 / 7
गश्मीरच्या फोटोवर चाहत्यांना लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. “तुम्हाला पुन्हा बघून आनंद झाला,” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने “आम्ही तुमच्या बरोबर आहोत,” असं म्हटलं आहे.
6 / 7
अभिनेत्री ऋजुता देशमुखनेही गश्मीरच्या फोटोंवर कमेंट करत “ईश्वराची कृपा राहू दे. काळजी घे” असं म्हटलं आहे.
7 / 7
गश्मीरने अनेक मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. ‘पानीपत’, ‘देऊळ बंद’ या चित्रपटात गश्मीर आणि रविंद्र महाजनी ही पितापुत्रांची जोडी एकत्र दिसली होती.
टॅग्स :गश्मिर महाजनीरवींद्र महाजनीमराठी अभिनेता