घरच्यांचा नात्याला होता विरोध, ठेवली होती अट...; अशी आहे शिवानी-अजिंक्यची हटके लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 12:41 IST
1 / 10मराठी कलाविश्वातील रोमँटिक कपल्सपैकी एक शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांनी नुकताच गुपचूप साखरपुडा केला आहे. त्यांची ३१ जानेवारीला एंगेजमेंट पार पडली असून फोटो शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे.2 / 10शिवानी आणि अजिंक्य काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा दोघेही फिरायला जातात गेला तिथले रोमँटिक फोटो शेअर करत असतात. ते दोघे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत.3 / 10शिवानी आणि अजिंक्यची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. तू जीवाला गुंतवावे या मालिकेमुळे त्या दोघांची भेट झाली. तिथेच त्यांची मैत्री झाली. पण, मालिका संपल्यावर हे काहीतरी वेगळे आहे याची जाणीव त्या दोघांना झाली. 4 / 10मालिका संपल्यानंतर शिवानी आणि अजिंक्यच्या भेटीगाठी वाढल्या, एकत्र दिवस घालवणं या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. त्या दोघांनी एकमेकांना कधीच प्रपोज वगैरे केले नाही. एकत्र आलं पाहिजे असं त्यांना मनातून वाटू लागले होते,असे एका मुलाखतीत शिवानीने सांगितले होते.5 / 10२०१५-१६ च्या दरम्यान त्यांच्या रिलेशनशिपला सुरूवात झाली. त्यानंतर वर्षभराने म्हणजेच साधारण २०१७ मध्ये त्यांनी त्याच्या नात्याबद्दल घरी सांगितले. याबद्दल शिवानीने सांगितले होते की, मी माझ्या आईला सर्वात आधी कल्पना दिली होती. त्यानेही त्याच्या घरी सांगितले आणि दोन्ही घरातून आमच्या नात्याला ठळक विरोध आला. 6 / 10हे फक्त आकर्षण आहे असं आमच्या घरच्यांचं मत होतं. तुम्हाला वाटत असेल तुमचं प्रेम खरं आहे आणि आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवावा, तर तुम्ही दोघेही आम्हाला एकत्र राहून दाखवा असं आम्हाला घरुन सांगितलं गेले, असे तिने सांगितले.7 / 10शिवानी आणि अजिंक्य एकत्र राहू लागले. लॉकडाऊन सुरू झाल्यावर त्यांच्या घरच्यांना त्यांच्या नात्यावर विश्वास बसला. अजिंक्यचे बाबा म्हणाले, जर तुम्ही लॉकडाऊन न भांडता काढताय, तर तुम्ही आयुष्यभर एकत्र राहू शकता. 8 / 10४ वर्षांनंतर त्यांच्या घरच्यांनी या नात्याला परवानगी दिली. आता त्यांचा साखरपुडा पार पडला असून लवकरच ते लग्न करणार आहेत.9 / 10दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अजिंक्य सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. ही सध्याची टीआरपी मधील आघाडीची मालिका आहे.10 / 10 तर शिवानी सुर्वे मराठी सिनेमा गाजवत आहे. 'वाळवी' आणि झिम्मा २' असे तिचे बॅक टू बॅक 2 मराठी चित्रपट हिट झाले आहेत.