Join us
Daily Top 2Weekly Top 5

'श्वास' चित्रपटातील चिमुरडा 'परश्या' आठवतोय का?, पाहा आता कसा दिसतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 07:00 IST

1 / 12
२००४ साली रिलीज झालेला चित्रपट श्वास सगळ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटाची कथा आजोबा आणि नातवाच्या नात्याभोवती फिरते. 'श्यामची आई' या चित्रपटानंतर ५० वर्षानंतर २००४ मध्ये श्वास चित्रपटाला सर्वाोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
2 / 12
या चित्रपटात आजोबांची भूमिका अरुण नलावडे यांनी साकारली होती तर नातवाची भूमिका अश्विन चितळेने.
3 / 12
श्वास चित्रपटातील भूमिकेमुळे अश्विनला खूप लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर तो नागेश कुकुनूरच्या आशाऐं या हिंदी चित्रपटातही दिसला होता.
4 / 12
श्वास चित्रपटात खूप भावनिक कथा दाखवण्यात आला आहे. कोकणातील एका गावात राहणारे केशव विचारे (अरुण नलावडे) आणि त्यांचा सहा -सात वर्षांचा नातू परशुराम उर्फ परश्या (अश्विन चितळे) यांच्या भोवती चित्रपटाची कथा फिरताना दाखवली आहे.
5 / 12
रेतीनल कॅन्सर ग्रस्त नातवावर असलेले आजोबांचा प्रेम, त्याची काळजी हे या चित्रपटात अत्यंत सुंदररित्या रेखाटण्यात आले आहे. विशेष म्हणजे अश्विन चितळे या बालकलाकाराने नातवाची भूमिका खूप छान साकारली होती.
6 / 12
श्वासमुळे लोकप्रियता मिळविलेला अश्विन चितळे आता कसा दिसतो किंवा काय करतो, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. अश्विन आता खूपच वेगळा दिसत असून त्याला ओळखणंही कठीण झाले आहे.
7 / 12
बालकलाकार म्हणून अश्विन चितळेने आहिस्ता आहिस्ता , जोर लगाके हैय्या , टॅक्सी नं ९२११,देवराई या हिंदी-मराठी सिनेमात काम केले. मात्र त्यानंतर आता तो मराठी चित्रपटसृष्टीत काम करत नाही आहे.
8 / 12
अश्विन चितळे मूळचा पुण्याचा आहे. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयातून त्याने शालेय शिक्षण घेतले. सर परशुरामभाऊ कॉलेजमधून भूगोल, फिलॉसॉफी तसेच टिळक महाराष्ट्र युनिव्हर्सिटी मधून इंडोलॉजि विषयातून त्याने शिक्षण पूर्ण केले आहे.
9 / 12
त्याने अश्विन हेरीटेज टूर्स सुरू केले आहे. ज्याचा तो स्वतः डायरेक्टर फाउंडर आणि सीईओदेखील आहे. अश्विन हेरिटेज टूर्सच्या माध्यमातून तो पर्यटकांसाठी अनेक ठिकाणांच्या टूर्स अरेंज करतो आहे. यातून भारतीय स्थापत्य कलेचे दर्शन पर्यटकांना आकर्षित करताना दिसते. त्याच्या या कार्याला अनेक पर्यटक प्रेमींकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे.
10 / 12
गेल्या चार वर्षांपासून अश्विन चितळे फारसी भाषेचं ज्ञान अवगत करतोय. इंडोलॉजीचा अभ्यासक म्हणून त्याने फारसी भाषा शिकायला सुरूवात केली.
11 / 12
याचदरम्यान अश्विनच्या आयुष्यात ‘रुमी’ आला. होय, दिग्गज सूफी कवी रूमीच्या कवितांनी त्याला वेड लावलं. यानंतर त्याने रूमीच्या आयुष्यात खोलवर डोकावायला सुरूवात केली.
12 / 12
रूमीच्या पौराणिक कथा, त्याचे साहित्य संकलित करून त्याने त्याचे भाषांतर केले. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर तो फक्त रूमीच्या शायऱ्या, कविता अपलोड करतो. रूमीवरच्या अनेक कार्यक्रमाचे नियोजन, कथाकथनही तो सादर करतो.