प्राजक्ता माळीचं पहिलं प्रेम कोण होतं माहित्येय का?, स्वतःच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 17:20 IST
1 / 11अभिनेत्री प्राजक्ता माळी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी चित्रपटामुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. तिच्या मुलाखतींमध्येही देखील तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे खुलासे केले आहेत.2 / 11सर्वात जास्त चर्चा प्राजक्ता माळीच्या लव्ह लाइफबद्दल होताना दिसते. तिच्या चाहत्यांना देखील तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. 3 / 11फुलवंती चित्रपटानंतर प्राजक्ता माळीच्या चाहत्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे.4 / 11प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत तिच्या पहिल्या प्रेमाबद्दल किंवा क्रशबद्दल सांगितले होते.5 / 11प्राजक्ताचे पहिले क्रश किंवा तिचे प्रेम म्हणजे बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर. ती म्हणाली होती की,'' रणबीरकडे पाहिले की मला नेहमीच प्रेमात असल्यासारखे वाटते.''6 / 11रणबीरमधील कोणती गोष्ट प्राजक्ताला सर्वात जास्त भावते. याबद्दल ती म्हणाली की, ''रणबीर मला खूप आवडतो. तो सोशल मीडियावर फार सक्रीयदेखील नाही. तो त्याचं वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियावर शेअर करत नाही. त्याच्या आसपासच्या लोकांकडून त्याचे सोशल आयुष्य आपल्याला दिसते.'' 7 / 11रणबीर कपूरनंतर तिच्या मनात असणारा दुसरा क्रश म्हणजे मराठमोळा अभिनेता आणि तिचा चांगला मित्र वैभव तत्त्ववादी.8 / 11प्राजक्ताने 'कॉफी आणि बरंच काही' हा चित्रपट पाहिल्यानंतर वैभव तिला आवडायला लागल्याचे सांगितले होते. तिने त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.9 / 11प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत सांगितले होते की, '''कॉफी आणि बरंच काही' हा चित्रपट पाहिल्यानंतर मला वैभव आवडायला लागला. मी आईला देखील वैभवला जावई म्हणून स्वीकारायला सांगितले होते. ''10 / 11प्राजक्ताने पुढे हेही सांगितले की, ''वैभव आणि ती खूप चांगले मित्र आहेत. आणि त्यांच्यात एक निखळ मैत्री आहे.''11 / 11प्राजक्ता माळी सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात पाहायला मिळते आहे. या शोचं सूत्रसंचालन ती करते आहे.