अलका कुबल यांच्या लेकींची टोपण नावं माहितीये का? आई अभिनेत्री असूनही मुली राहतात लाईमलाईटपासून दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 07:00 IST
1 / 13अभिनेत्री अलका कुबल यांनी विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.2 / 13रुपेरी पडद्यावर सून, लेक अशा व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.3 / 13अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांना दोन मुली आहेत एकीचे नाव आहे ईशानी तर दुसरीचे नाव आहे कस्तुरी.4 / 13या दोघी सिनेइंडस्ट्रीऐवजी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.5 / 13अभिनेत्री अलका कुबल- आठल्ये यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर ईशानीच्या वाढदिवसानिमित्ताने फोटो शेअर केले आहेत. त्यांनी ईशानीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बेडकी. 6 / 13देवाचा आशीर्वाद तुझ्या नेहमी पाठीशी आहे. तुझे सर्व स्वप्न पूर्ण होवोत, असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.7 / 13या फोटोवरून अलका कुबल त्यांची थोरली लेक ईशानीला बेडकी अशी हाक मारतात.8 / 13तर इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांनी दुसरा फोटो शेअर केला आहे. ज्यात त्यांच्या दोन्ही मुली पाहायला मिळत आहेत. 9 / 13या फोटोवर त्यांनी माझी बेडकी आणि छुटकी असं लिहिले आहे. 10 / 13ईशानी वैमानिक आहे. तिच्यामध्ये लहानपणापासूनच जिद्द होती की, आपण काहीतरी वेगळे करायचे जे केल्याने तिची समाजात एक वेगळीच ओळख निर्माण होईल. त्यामुळे तिने अभिनयाचे क्षेत्र न निवडता वैमानिक बनायचा निश्चय केला.11 / 13ईशानीने वैमानिक बनण्यासाठी खूप मेहनत घेतली. तिने शिक्षण घेत असताना खूप अभ्यास केला मेहनत घेतली आणि तिने घेतलेल्या मेहनतीचे फळही तिला चांगलेच भेटले. त्यानंतर तिला व्यावसायिक विमान चालवण्यासाठी लायसेन्स देखील भेटले आहे.12 / 13ईशानीचे दिल्लीतील निशांत वालियासोबत लग्न झाले आहे.13 / 13अलका कुबल यांची धाकटी मुलगी कस्तुरी परदेशात डर्मेटोलॉजिस्टचे शिक्षण घेते आहे.