Join us  

केतकी माटेगावकरच्या आईला पाहिलंत का?; फोटो शेअर करत म्हणाली - 'देवाची पूजा करुन...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 11:25 AM

1 / 9
अभिनेत्री, गायिका केतकी माटेगावकर हिने शाळा, टाइमपास यासह विविध चित्रपटातील अभिनयामुळे रसिकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलेलं आहे.
2 / 9
या चित्रपटांतील भूमिकांमुळे एक सोज्वळ अभिनेत्री अशीच ओळख केतकी माटेगावकरच्या फॅन्सच्या मनात आहे.
3 / 9
केतकी माटेगावकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
4 / 9
केतकी माटेगावकर सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते आणि बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
5 / 9
दरम्यान, आता केतकी माटेगावकरने तिच्या आईसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. केतकी माटेगावकरने आईसोबत दिवाळी निमित्ताने फोटोशूट केले आहे.
6 / 9
तिने फोटो शेअर करत लिहिले की, देवाची पुजा करुन आई मिळवता येत नाही... आईची पुजा करुन देव मिळवता येतो. माझी गोड आई.
7 / 9
केतकी माटेगावकरच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
8 / 9
सोशल मीडियावर केतकी माटेगावकरचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.
9 / 9
केतकीने शाळा, टाईमपास, टाईमपास-२, काकस्पर्श, तानी अशा विविध चित्रपटांमधून अभिनय केला आहेत.
टॅग्स :केतकी माटेगावकर