1 / 12फोटोत शर्टमध्ये असलेल्या या चिमुरडीला ओळखलंत का?, नाहीत ना..ही चिमुरडी दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री रिंकू राजगुरू आहे. 2 / 12अभिनेत्री रिंकू राजगुरूचा आज वाढदिवस असून सोशल मीडियावर तिचे चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.3 / 12रिंकू राजगुरूने सैराट चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने या चित्रपटात आर्चीची भूमिका साकारली होती.4 / 12आर्चीच्या भूमिकेतून रिंकू राजगुरूला खूप लोकप्रियता मिळाली आहे. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे. 5 / 12रिंकू राजगुरूने सैराट चित्रपटानंतर स्वतःमध्ये खूप बदल केला आहे. 6 / 12रिंकू राजगुरूचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते हैराण झाले होते. तिच्या या लूकची सर्वत्र चर्चा झाली होती.7 / 12रिंकू राजगुरू ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.8 / 12सैराट चित्रपटानंतर रिंकू राजगुरूने कधी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर ती कागर, मेकअप या चित्रपटात झळकली.9 / 12याशिवाय तिने १००, अनपॉज्ड, २०० हल्ला हो या सीरिजमध्येही काम केले आहे.10 / 12तसेच ती अमिताभ बच्चन अभिनीत आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड या चित्रपटात पाहायला मिळाली.11 / 12आता ती लवकरच आठवा रंग प्रेमाचा, छुमंतर या मराठी चित्रपटात झळकणार आहे.12 / 12रिंकू राजगुरूच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.