Join us
Daily Top 2Weekly Top 5

'देवकी' मालिकेतील चिमुकला आठवतोय का? अजूनही दिसतो तसाच, आता काय करतो माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 15:59 IST

1 / 9
२००१ साली प्रदर्शित झालेला देवकी सिनेमा प्रचंड गाजला. या मालिकेत अलका कुबल, मिलिंद गवळी, सुधीर जोशी, शिल्पा तुळसकर, गिरिष ओक मुख्य भूमिकेत होते.
2 / 9
या सिनेमात बालकलाकार अनुराग वरळीकर याने छोट्या रोहनची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना आवडली होती.
3 / 9
इतक्या वर्षांनंतर आता अनुराग कसा दिसतो? काय करतो? हे तुम्हाला माहितीये का?
4 / 9
अनुराग सध्या ऑनस्क्रीन दिसत नसला तरी तो अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अभिनेता असण्यासोबतच तो उत्तम दिग्दर्शकही आहे.
5 / 9
देवकी सिनेमानंतर तो दे धमाल मालिकेत दिसला होता. त्यातील चिनू हे पात्र गाजलं होतं.
6 / 9
त्याने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. बारायण, पोर बाझार, विठ्ठल विठ्ठल या सिनेमांमध्ये तो झळकला आहे.
7 / 9
तर डॉक्टर डॉन या मालिकेतही अनुराग महत्त्वाच्या भूमिकेत होता.
8 / 9
इतक्या वर्षांनंतरही अनुराग अगदी लहानपणी दिसायचा तसाच दिसतो. त्याच्याच जराही बदल झालेला नाही.
9 / 9
गेल्याच वर्षी अनुराग लग्नाच्या बेडीत अडकला आहे. तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.
टॅग्स :मराठी अभिनेतासिनेमा