'देऊळ बंद'मधली गश्मीरची छोटी मुलगी आठवतेय? आता दिसते अशी की, पाहून थक्क व्हाल
By देवेंद्र जाधव | Updated: October 29, 2025 17:15 IST
1 / 7२०१६ साली रिलीज झालेला 'देऊळ बंद' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमात गश्मीर महाजनीने प्रमुख भूमिका साकारली होती. सिनेमात गश्मीरच्या मुलीची भूमिकाही चांगलीच गाजली2 / 7सिनेमातील ती छोटी मुलगी आता मोठी झाली आहे. तिचं नाव आहे आर्या घारे. आर्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 3 / 7'देऊळ बंद'ची हीच छोटी मुलगी आहे का, असा प्रश्न सर्वांना पडलाय. आर्याने मोठं झाल्यावरही अभिनयाची आवड जोपासली आहे.4 / 7'देऊळ बंद' सिनेमानंतर 'ग्रेट माय इंडिया', 'बंदिशाळा', 'अ ब क' यांसारख्या सिनेमांमध्ये आर्या झळकली. आर्याने विविध सिनेमांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.5 / 7आर्या घारेने 'गाथा नवनाथांची' मालिकेत काम केलं होतं. याशिवाय विविध मालिका आणि म्यूझिक व्हिडीओमध्ये आर्याने काम केलंय.6 / 7आर्या घारेने 'देऊळ बंद' सिनेमानंतर स्वतःच्या व्यक्तिमत्वात चांगला बदल केलाय. त्यामुळेच 'देऊळ बंद'ची आर्या आता चाहत्यांना थक्क करुन सोडतेय7 / 7आर्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची सर्वांना उत्सुकता आहे. सध्या आर्या तिच्या शैक्षणिक आयुष्यावर आणि सामाजिक कामांमध्ये लक्ष देत असल्याचं समजतंय