By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:21 IST
1 / 9२०१५ साली प्रदर्शित झालेला 'देऊळ बंद' सिनेमा प्रचंड गाजला. स्वामी समर्थ प्रचिती आणि भक्तीवर हा सिनेमा आधारित होता. 2 / 9या सिनेमात गश्मीर महाजनीची मुख्य भूमिका होती. शास्त्रज्ञ असलेला गश्मीर त्याच्या कुटुंबासह भारतात एका प्रोजेक्टसाठी आल्याचं दाखवण्यात आलं होतं. 3 / 9'देऊळ बंद' सिनेमात गश्मीरच्या मुलीची भूमिका बालकलाकार आर्या घारे हिने साकारली होती. 4 / 9या सिनेमातील तिची भूमिका चाहत्यांनाही आवडली होती. पण आता आर्यामध्ये खूपच बदल झाला आहे. 5 / 9१० वर्षांनंतर आता आर्याला ओळखणंही कठीण झालं आहे. आर्याने बालकलाकार म्हणूनच इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती. 6 / 9अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. मुक्ता बर्वेच्या बंदिशाळा सिनेमातही ती दिसली होती. 7 / 9पोश्टर गर्ल या सिनेमात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. गाथा नवनाथांची या मालिकेतही आर्या झळकली आहे. 8 / 9ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. आर्या तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओही इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. 9 / 9महेश मांजरेकर, गश्मीर महाजनी, मुक्ता बर्वे, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ झाडबुके, जितेंद्र जोशी अशा कलाकारांसोबत तिने काम केलं आहे.