Join us
Daily Top 2Weekly Top 5

'देऊळ बंद २'ची चर्चा, पण पहिल्या भागातली 'ही' चिमुकली आठवतेय? आता दिसते खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 11:18 IST

1 / 9
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या 'देऊळ बंद २'चा नुकताच टीझर आला. 'आता परीक्षा देवाची' अशा आशयावर आधारित शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2 / 9
दरम्यान जुलै २०१५ साली 'देऊळ बंद' आला होता जो तुफान गाजला होता. गश्मीर महाजनीने सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. एक महान वैज्ञानिक आणि श्री स्वामी समर्थ यांच्यातील द्वंद्व या सिनेमात बघायला मिळालं. हा सिनेमा चांगलाच गाजला
3 / 9
या चित्रपटात त्याच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार्‍या बालकलाकारानेही लक्ष वेधून घेतलं होतं.तिचं नाव आहे आर्या घारे.
4 / 9
आर्याच्या भूमिकेने सिनेमातील कथानकाला वेगळं वळण दिलं होतं. तिने राघव शास्त्रीचा पासवर्डच बदलला होता ज्यामुळे त्याला स्वामींची परिक्रमा करावी लागली होती.
5 / 9
ती छोटी आर्या घारे आता मोठी झाली असून खूप सुंदर दिसत आहे. तिने एकापेक्षा एक लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
6 / 9
'देऊळ बंद २' मध्ये आर्याची भूमिका नाही हे तिने स्पष्ट केलं. तसंच तिने सोशल मीडिया पोस्ट करत सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. देऊळ बंद या सिनेमामुळेच आपल्याला ओळख मिळाली आणि ही ओळख कायम राहील अशाही तिने भावना मांडल्या.
7 / 9
'देऊळ बंद' सिनेमानंतर 'ग्रेट माय इंडिया', 'बंदिशाळा', 'अ ब क' यांसारख्या सिनेमांमध्ये आर्या झळकली. आर्याने विविध सिनेमांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.
8 / 9
आर्या घारेने 'गाथा नवनाथांची' मालिकेत काम केलं होतं. याशिवाय विविध मालिका आणि म्यूझिक व्हिडीओमध्ये आर्याने काम केलंय.
9 / 9
काही वर्षांपूर्वी आर्याने प्रवीण तरडेंसोबतचा फोटो शेअर केला होता. तो फोटो पाहून नेटकरीही सिनेमाच्या आठवणीत रमले. आर्या तिच्या सिनेसृष्टीतील अनुभवासाठी कायम प्रवीण तरडेंना श्रेय देते.
टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीप्रवीण तरडेगश्मिर महाजनीमोहन जोशी