अवघ्या ४०व्या वर्षी जग सोडून गेला 'अशी ही बनवाबनवी'चा कलाकार, लग्नाला झालेली फक्त ५ वर्ष, आहेत दोन मुलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 16:14 IST
1 / 10'अशी ही बनवाबनवी' हा मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील सर्वात गाजलेला आणि अजरामर सिनेमा आहे. आजही हा सिनेमा तितकाच लोकप्रिय आहे. 2 / 10सिनेमातील गाणी असो वा संवाद प्रेक्षकांच्या आजही तोंडावर असतात. त्यातील कलाकारांनी साकारलेली पात्रही प्रेक्षकांना भावली. 3 / 10'अशी ही बनवाबनवी'मध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ रे, निवेदिता सराफ, सुधीर जोशी अशी स्टारकास्ट होती. 4 / 10पण, दुर्देवाने यातील काही कलाकार आज आपल्यात नाहीत. यातीलच एक म्हणजे सिद्धार्थ रे. 5 / 10सिद्धार्थ रे यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडही गाजलं. 'अशी ही बनवाबनवी'मध्ये त्यांनी शंतनू ही भूमिका साकारली होती. 6 / 10'वंश', 'बाझीगर', 'पनाह', 'गंगा का वचन', 'युद्धपथ', 'दिवाने', 'खलनायक' अशा अनेक गाजलेल्या बॉलिवूड सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. 7 / 10सिद्धार्थ रे हे व्ही. शांताराम यांचे नातू होते. त्यामुळे बालपणीच त्यांना अभिनयाचं बाळकडू मिळालं होतं. 8 / 10सिद्धार्थ रे यांनी अभिनेत्री शांतीप्रियाशी लग्न केलं होतं. पण, लग्नानंतर अवघ्या ५ वर्षांनीच त्यांचा मृत्यू झाला. 9 / 10वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थ रे यांना हार्ट अटॅक आला. ८ मार्च २००४ रोजी त्यांचं निधन झालं. त्यांना दोन मुलं आहेत. 10 / 10सिद्धार्थ यांच्या मृत्यूनंतर शांतीप्रिया त्यांच्या दोन मुलांचा सांभाळ करत आहे.