Join us  

अंकुश चौधरीची पत्नी या मालिकेत करतेय काम, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 6:24 PM

1 / 9
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले. अंकुशची पत्नी दिपा परब-चौधरी ही देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
2 / 9
अभिनेत्री दीपा परब-चौधरी स्टार प्लस वाहिनीवरील शौर्य और अनोखी की कहानी मालिकेत पहायला मिळते आहे.
3 / 9
या मालिकेतील दीपाच्या कामाचे सगळीकडे खूप कौतूक होत आहे.
4 / 9
बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर दीपाने अभिनय क्षेत्रात कमबॅक केले आहे.
5 / 9
दिपा लग्नानंतर खूपच कमी चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते.
6 / 9
शेवटची ती अंड्याचा फंडा या चित्रपटात झळकली होती.
7 / 9
अंकुश आणि दिपाने २००७ साली लग्न केले. ते दोघे त्यांच्या संसारात प्रचंड खूश असून त्यांना प्रिन्स नावाचा मुलगा देखील आहे.
8 / 9
केदार शिंदेच्या ऑल द बेस्ट या नाटकात अंकुश आणि दिपाने एकत्र काम देखील केले आहे. त्यानंतर दिपा परब आपल्याला अनेक जाहिरातींमधून आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
9 / 9
'थोडी ख़ुशी थोडा गम', 'छोटी मॉ', 'मित' आणि 'रेत' यासारख्या हिंदी मालिकेत ती झळकली आहे.
टॅग्स :अंकुश चौधरी