Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिपोर्टरची नोकरी सोडून अभिनयाकडे वळली, नातेवाईकांकडे राहून दिवस काढले, आज 'ती' मराठीतली स्टार, ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 15:59 IST

1 / 8
चित्रपटसृष्टी ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी आहे असं म्हटलं जातं. या क्षेत्रामध्ये ज्याची चलती असते त्यालाच संधीचे व्दार खुले असतात.
2 / 8
मात्र, मनोरंजन विश्वातील काही अभिनेते,अभिनेत्री याला अपवाद ठरले. त्यापैकीच एक नाव म्हणजे प्रार्थना बेहरे.
3 / 8
अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नाही, शिवाय इंडस्ट्रीत कोणीही गॉडफादर नसताना या नायिकेने स्वत च्या मेहनतीच्या जोरावर नाव कमावलं आहे.
4 / 8
प्रार्थना बेहरे मराठी मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेली अभिनेत्री आहे. प्रार्थनाने २००९ साली टीव्ही जगतातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' मालिकेतील तिची भूमिका बरीच गाजली होती.
5 / 8
त्यानंतर ती मराठी चित्रपटांकडे वळली. व्हॉट्स अप लग्न, मितवा, कॉफी आणि बरंच काही,मिस्टर अँड मिसेस सदाचारी यांसारख्या चित्रपटांमध्ये ती अभिनय करताना दिसली.
6 / 8
अलिकडेच आरपारला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थनाने तिच्या प्रवासाविषयी सांगितलं. इंडस्ट्रीत येण्याआधी करिअरच्या सुरुवातीला प्रार्थना एका न्यूज चॅनेलमध्ये कामाला होती. एका प्रेस कॉन्फरन्समध्ये थेट बिग बींना प्रश्न विचारल्याने तिची माध्यमांमध्ये खूप चर्चा झाली होती.
7 / 8
मुंबईत आल्यानंतर प्रार्थना सुरुवातीला तिच्या मामाकडे राहत होती. या प्रवासात तिला तिच्या मामेभावाची खूप मदत झाली, कारण,नव्या शहरात सगळं काही नवीन होतं.
8 / 8
सध्याच्या घडीला प्रार्थना ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या नायिकांमध्ये गणली जाते.प्रार्थना बेहरे हिने अभिषेक जावकरसोबत १४ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली.अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. अभिषेक जावकरने काही तेलगू चित्रपटांचे वितरण केलं आहे. मूळ ‘सिंघम’ चित्रपटाची निर्मितीही त्यानेच केली आहे.
टॅग्स :प्रार्थना बेहरेमराठी चित्रपटसेलिब्रिटी