Join us

'आरपार'मध्ये हृताच्या प्रेमात पडलेला 'तो' कोण? फॉरेनची बायको अन् गोंडस मुलीचा बाबा आहे अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 15:18 IST

1 / 8
ललित प्रभावकर आणि हृता दुर्गुळेचा 'आरपार' सिनेमा गेल्या आठवड्यात रिलीज झाला. यातील ललित आणि हृताची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली आहे.
2 / 8
प्रेमात काहीच अधलं मधलं नसतं, जे असतं ते 'आरपार' अशी सिनेमाची टॅगलाईन आहे. या वाक्याचा जशाचा तसा अर्थ सिनेमात लागतो.
3 / 8
ललित-हृता एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दोन प्रेमी. पण जेव्हा त्यांच्यात तिसऱ्याची एन्ट्री होते तेव्हा नातं हिंसक वळणही घेतं. ललितचा यामध्ये कबीर सिंह सारखा अवतार पाहायला मिळत आहे
4 / 8
सिनेमात ललित आणि हृताच्या मध्ये आलेला एक मुलगा नक्की कोण आहे? त्या मुलाची भूमिका साकारली आहे अभिनेता मन्यू दोषीने.
5 / 8
मन्यू दोषी हा अभिनेता आणि क्रिएटर आहे. त्याने कॅलिफोर्निया येथे थिएटरचं शिक्षण घेतलं आहे. तसंच तो लेखक आणि निर्माताही आहे. केसीसी ही त्याची प्रोडक्शन कंपनी आहे. त्याने ४ जाहिरातींची निर्मिती केली आहे.
6 / 8
याशिवाय मन्यूने हिंदी काम केलं आहे. 'लव्ह पर स्क्वेअर फूट', 'द वॉरियर क्वीन ऑफ झाँसी', 'फोटोग्राफ' या सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे.
7 / 8
तसंच काही हिंदी वेबसीरिजमध्येही तो दिसला आहे. 'रामदेव : एक संघर्ष', 'रंगबाज फिर से' तसंच सोनाक्षी सिन्हाच्या 'दहाड' या सीरिजमध्ये त्याची भूमिका आहे.
8 / 8
मन्यूची खऱ्या आयुष्यातली बायको ही परदेशी आहे. कॅथरिन असं तिचं नाव आहे. दोघं मिळून अॅक्टिंग वर्कशॉपही घेतात. त्यांना एक गोंडस मुलगीही आहे.
टॅग्स :ललित प्रभाकरऋता दूर्गुळेमराठी चित्रपटमराठी अभिनेतासेलिब्रिटी