'अशी ही बनवाबनवी'ची ३७ वर्ष! अवघ्या ३ रुपयांच्या तिकिट दरात सिनेमाने किती कमाई केली? वाचून व्हाल थक्क
By देवेंद्र जाधव | Updated: September 23, 2025 13:24 IST
1 / 7१९८८ साली प्रदर्शित झालेला सचिन पिळगावकर दिग्दर्शित 'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट आजही आवडीने पाहिला जातो. या चित्रपटाला आज ३७ वर्ष पूर्ण झाली आहेत2 / 7जवळपास ३७ वर्षांनंतरही हा चित्रपट आजही टीव्हीवर लागला की, लोक तो आवर्जून पाहतात. या चित्रपटातील प्रत्येक संवाद, प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांच्या लक्षात आहे.3 / 7१९८८ च्या काळात 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटाची तिकिटे ३ ते ५ रुपयांपर्यंत होती. या दरातही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.4 / 7३ रुपयांचं तिकिट असलेल्या 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटाने त्या काळात तब्बल ३ कोटींची कमाई केली होती. प्रेक्षकांनी चित्रपटाला हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला होता5 / 7सध्याच्या काळात ३ कोटींचा हा आकडा कमी वाटू शकतो, पण त्यावेळची महागाई आणि तिकिट दराचा विचार करता, ३ कोटींचा आकडा हा आज १०० कोटींहून अधिक मानला जातो. 6 / 7'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट अनेक आठवडे 'हाउसफुल' होता. पुण्यातील प्रभात टॉकीजला चित्रपट ज्यांनी पाहिलाय ते अजूनही या चित्रपटाची खास आठवण जागवतात.7 / 7'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील 'लक्ष्मीकांत बेर्डेेंचा धनुष्यबाण', 'हा माझा बायको पार्वती', 'लिंबू कलरची साडी', '७० रुपयांची नोट', हे खास प्रसंग आजही सर्वांच्या लक्षात आहेत.