By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 17:35 IST
1 / 7सध्या सगळीकडे 'फुलवंती' चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसते आहे. 2 / 7पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली 'फुलवंती' ही अलौकिक कलाकृती चित्रपटाच्या माध्यमातून आता प्रेक्षकांसमोर येत आहे. 3 / 7येत्या ११ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.4 / 7अभिनेत्री प्राजक्ता माळी या चित्रपटामध्ये 'फुलवंती' नावाच्या सुप्रसिद्ध नर्तिकेच्या भूमिकेत दिसते आहे. तर अभिनेता गश्मीर महाजनीदेखील चित्रपटात पाहायला मिळतोय.5 / 7दरम्यान, नुकतेच प्राजक्ताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो पोस्ट केले आहेत.6 / 7चित्रपटामध्ये नृत्य सादरीकरण करतानाचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 7 / 7या फोटोंमध्ये हिरवी नऊवारी साडी त्यावर मरामोळा साज अशा पेहरावात प्राजक्ता पाहायला मिळते आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीचे हे व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.