1 / 7सोशल मीडिया हे माध्यम प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चाललं आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटी मंडळीदेखील यावर आपल्या आयुष्यातील अपडेट्स शेअर करताना दिसतात.2 / 7सध्या सोशल मीडियावर एका मराठी अभिनेत्रीच्या व्हायरल होणाऱ्या फोटोची चर्चा रंगली आहे. अनेकजण तिला ओळखूच शकले नाहीत. ही अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे आहे. 3 / 7गौरी नलावडे हे मराठी मनोरंजनविश्वातील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक असलेलं नाव आहे. 4 / 7'स्वप्नांच्या पलिकडले', 'सूर राहू दे' या मालिकांमधून गौरी घराघरांत लोकप्रिय झाली. मालिकाविश्व गाजवल्यानंतर गौरीने काही मराठी चित्रपटांमध्येही मुख्य भुमिका साकारल्या.'कान्हा', 'गोदावरी' या सिनेमांमध्ये काम करून तिने मराठी मनोरंजन विश्वात आपला दबदबा निर्माण केला.5 / 7गौरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अभिनयाबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते.6 / 7नुकतंच तिने हटके अंदाजात फोटोशूट करुन चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 7 / 7हातात फुलं घेऊन उभी ती चेहऱ्यासमोर धरुन अभिनेत्रीने हे फोटो क्लिक केले आहेत. त्यामुळे अभिनेत्रीचे हे फोटो लक्षवेधी ठरत आहेत.'तुमची प्रेमाची भाषा काय आहे... ', असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.