By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 15:56 IST
1 / 9खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारा आणि कामगारांच्या पोटाची भूक भागवणारा तसंच मुंबईकरांची जान असणारा हा वडापाव... सेलिब्रिटींनाही वडा पाव खाण्याचा मोह आवरत नाही. पण मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित अपवाद आहे.2 / 9गेल्या १४-१५ वर्षांपासून तेजस्विनीने वडापाव खाणं सोडून दिलं आहे. यामागचं कारण ऐकून तुम्हीही भावुक व्हाल.3 / 9नुकतंच तेजस्विनीने प्लॅनेट मराठीवरील ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात तिने वडापाव खाणं का सोडलं, याचं कारण सांगितलं.4 / 9“मी वडापाव खाणं फार वर्षांपूर्वी सोडून दिलं आहे. माझा एक मित्र आहे जो आता या जगात नाही. पण त्याच्यासाठी मी खरंच वडापाव खाणं सोडून दिलं आहे”, असं ती यावेळी भावूक होत म्हणाली.5 / 9तर घटना १४-१५ वर्षांपूर्वीची आहे. तेजस्विनी जेव्हा पुण्यात राहत होती त्यावेळी तिची बहीण, मित्र मैत्रिणी सगळेजण वडापाव खायला वडगाव बुद्रुकला जायचे.6 / 9मात्र तेजस्विनी अमर नावाचा एक बेस्ट फ्रेंड एका अपघातात गेला. अमरला वडापाव खूप आवडायचा आणि त्याच्या आठवणीत तेजस्विनी आजही वडापाव खात नाही. 7 / 9अमर गेला आणि मी वडापाव खाणं सोडलं. मला त्याची चवही आठवत नाही, असे म्हणत तेजस्विनीला एका कार्यक्रमात अश्रू अनावर झाले होते.8 / 9 तेजस्विनी पंडितने केदार शिंदेच्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 9 / 9काही दिवसांपूर्वी तेजस्विनीने ‘अथांग’ वेबसीरिजची निर्मिती केली आहे. त्यानंतर ‘बांबू’ हा तिने प्राेड्यूस केलेला सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे.