Join us
Daily Top 2Weekly Top 5

Photos: मराठमोळ्या मानसी साळवीचा पारंपरिक लूक, जांभळ्या साडीत खुललं सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 13:17 IST

1 / 7
मराठमोळी अभिनेत्री मानसी साळवी (Manasi Salvi) हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. सध्या 'गुम है किसी के प्यार मे' मालिकेत ती दिसत आहे.
2 / 7
मानसीचं सौंदर्य खरोखर भुलवणारं आहे. वयाच्या ४४ व्या वर्षीही तिचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही. उलट दिवसागणिक ती अधिक सुंदर दिसत आहे.
3 / 7
मानसी साळवीने नुकतेच जांभळ्या रंगाच्या साडीत फोटो पोस्ट केले आहेत. मराठमोळ्या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
4 / 7
काठापदराची जांभळी-हिरवी साडी, केसात गजरा, हिरव्या बांगड्या, सोन्याचे दागिने, नथ, कपाळावर टिकली असा तिचा संपूर्ण लूक प्रेमात पाडणारा आहे.
5 / 7
बागेतील बेंचवर बसून तिने हे फोटोशूट केलं आहे. वेगवेगळ्या पोज देत तिने आपल्या लूकची झलक दाखवली आहे. तिचे घारे डोळेही अक्षरश: काळजाचा ठोका चुकवणारे आहेत.
6 / 7
मानसीने अनेक मराठी, हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं. तिची 'प्यार का दर्द है मिठा मिठा प्यारा प्यारा' मालिका गाजली. तसंच 2006 साली आलेल्या 'आई शप्पथ' या सिनेमात ती अंकुश चौधरी आणि श्रेयस तळपदेसोबत झळकली. यातलं 'दिस चार झाले मन' हे गाणंही आजही लोकांच्या ओठांवर असतं.
7 / 7
मानसी साळवीने 2005 साली दिग्दर्शक हेमंत प्रभूशी लग्न केले. 'सती:सत्या की शक्ती' मालिकेच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. मात्र लग्नाच्या ११ वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. त्यांना ओमिषा ही १६ वर्षांची मुलगी आहे.
टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारटेलिव्हिजनसोशल मीडिया