Join us  

'बडी चंचल पवन हैं और में हूं...' हटके कॅप्शन असलेलं लक्ष्याच्या लेकीचं फोटोशूट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 4:59 PM

1 / 8
सुपरस्टार दिवंगत मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी कायमच चर्चेत असते.
2 / 8
वेगवेगळे नाटक तसेच एकांकिकेच्या माध्यमातून स्वानंदीने रसिकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
3 / 8
स्वानंदीने 'मन येड्यागत झालं' या मराठी चित्रपटात काम करून रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं.
4 / 8
निरागस प्रेम कहानीवर आधारित असलेल्या चित्रपटात तिने केलेल्या कामाचं सर्वांनीच तोंडभरून कौतुक केलं.
5 / 8
स्वानंदी बेर्डे ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याची पाहायला मिळते. विविध पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
6 / 8
अलिकडेच अभिनेत्रीने स्वत:च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
7 / 8
वेगवेगळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेली स्ट्राईप साडी तसेच त्यावर ऑफ शोल्डर ब्लाऊज परिधान करून स्वानंदीने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
8 / 8
त्या साडीवर तिनं कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ तसेच गळ्यात मोत्याचा हार, असे साजेसे दागिने घातल्याचे पाहायला मिळत आहेत.
टॅग्स :स्वानंदी बेर्डेलक्ष्मीकांत बेर्डेसेलिब्रिटी