Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोटोतील 'या' मुलीला ओळखलंत का? 'जोगवा' चित्रपटात साकारलेली महत्त्वाची भूमिका, आता गाजवतेय छोटा पडदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 18:51 IST

1 / 8
मराठी सिनेसृष्टीत आजवर अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.मात्र, त्यातील काही सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. या सिनेमांची जादू अजूनही ओसरली नाही.
2 / 8
या यादीतील एक नाव म्हणजे जोगवा. २००९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने समाजाच्या डोळ्यात जळजळीत अंजन घातलं होतं.आजही या चित्रपटातील गाणीसुद्धा आवर्जून ऐकली जातात.
3 / 8
जोगते आणि जोगतीणीच्या आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या या सिनेमात उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे प्रिया बेर्डे, विनय आपटे आणि किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट होती.
4 / 8
परंतु, तुम्हाला माहितीये का? या चित्रपटात मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनिता दाते देखील झळकली होती.
5 / 8
'जोगवा' चित्रपटामध्ये अनिताने अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे.
6 / 8
मन रानात गेलं गं या गाण्यामध्ये अभिनेत्रीची थोडी झलक झलक पाहायला मिळतेय. शिवाय तिच्या लग्नाचा देखील एक सीन चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
7 / 8
या चित्रपटात परकर पोलका आणि दोन वेण्यांमध्ये दिसणारी या नायिकेचा लूक आता पूर्णपणे बदलला आहे.
8 / 8
अनिताने जोगवा चित्रपटानंतर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेने अभिनेत्रीला खरी लोकप्रियता मिळवून दिली.सध्याच्या घडीला मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील ती आघाडीची नायिका आहे. अनिता सध्या इंद्रायणी मालिकेत पाहायला मिळतेय.
टॅग्स :अनिता दातेसेलिब्रिटीसिनेमा