1 / 15ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक विराजस कुलकर्णी आणि रांगोळे कुटुंबाची लाडकी कन्या शिवानी रांगोळे अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर लग्नबंधनात अडकले होते. नुकतंच त्यांच्या लग्नाचं शाही रिसेप्शन पार पडलं. या शाही रिसेप्शनचे फोटो समोर आले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहेत.2 / 15या रिसेप्शनची खास बात काय माहितीये? तर नववरवधूंना खुद्द मृणाल कुलकर्णी यांनी तयार केलं. मृणाल यांनी सूनबाईंना रिसेप्शनसाठी असं खास तयार केलं. यावेळी नव्या सुनेबद्दलचं प्रेम व कौतुक त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होतं.3 / 15लाडक्या लेकालाही आईनेच तयार केलं. यावेळी विराजस आईच्या प्रेमळ चेहऱ्याकडे एकटक बघत होता. आई आणि लेकाचा हा फोटो सगळ्यांनाच भावला.4 / 15सूनबाई रिसेप्शनसाठी तयार झाल्यावर मस्तपैकी फोटोसेशनही झालं. लाडक्या सुनबाईंनी सासूबाईंना अशी प्रेमळ मिठी मारली.5 / 15आईच्या डोळ्यांतील हे प्रेम बघा. पोराचं लग्न झालं, आज त्याचं रिसेप्शन आहे. तो नव्या आयुष्याची सुरूवात करतोय, याचं कौतुक मृणाल यांच्या डोळ्यांत वाचता येतं.6 / 15शिवानीने आईसोबतही पोझ दिली. रिसेप्शनवेळी शिवानी आईसोबत दिसली. या माऊलीच्या चेहऱ्यावरचा आनंदही ओसंडून वाहत होता.7 / 15शिवानी व विराजस यांच्या रिसेप्शनला अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अभिनेत्री कविता लाड यांनी नववधू वराला आशीर्वाद दिलेत.8 / 15अभिनेत्री श्रेया बुगडे ही सुद्धा रिसेप्शनला हजर होती. काळ्या रंगाच्या साडीत श्रेया कमालीची सुंदर दिसत होती.9 / 15गौतमी देशपांडे ही विराजसची खास मैत्रिण. मालिकेत एकत्र काम करता करता दोघांची मैत्री झाली. मग मित्राच्या रिसेप्शनला गौतमी येणारच.10 / 15अभिनेत्री सानिया चौधरी ही सुद्धा या रिसेप्शनला हजर होती. तिच्या लुकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कॅमेऱ्यांना तिनं अशी मस्त पोझ दिली.11 / 15विराजस व शिवानीच्या रिसेप्शनला सर्वांनी धम्माल मज्जा मस्ती केली. हा फोटो याचाच पुरावा. गौतमी व सानिया यांनी अशी धम्माल मस्ती केली.12 / 15मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे विराजस व शिवानीच्या रिसेप्शनला उपस्थित होते. त्यांनी कुलकर्णी व रांगोळे कुटुंबांसह नववधूवराला आशीर्वाद दिले.13 / 15हे शिवानीचे आई-बाबा तर विराजसचे सासू-सासरे. जावई बापूंनी सासू सासऱ्यांसोबत अशी झक्कास पोझ दिली.14 / 15रिसेप्शनमध्ये विराजस व शिवानी यांनी अशी रोमॅन्टिक पोझ दिली. या फोटोत दोघंही कमालीचे सुंदर दिसत आहेत.15 / 15रिशेप्शनमधील ही रांगोळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. या रांगोळीत शिवानी व विराजसचा फोटो व माझा होशील ना या मालिकेचं टायटल रेखाटण्यात आलं होतं.