Join us

हॅपी बर्थडे नवरोबा! अक्षयाने शेअर केले रोमँटिक Photos, म्हणाली "तु माझ्या हास्याचं कारण"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 14:00 IST

1 / 10
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले राणादा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांना मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं म्हणून ओळखले जाते.
2 / 10
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर हे पडद्यावरचे सहकलाकार खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकले. अक्षया-हार्दिक ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
3 / 10
आज हार्दिक जोशीचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने अक्षयानेही एक खास पोस्ट केली आहे. तिने हार्दिकसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
4 / 10
या फोटोंमध्ये हार्दिक आणि अक्षया दोघेही चाहत्यांना कपल गोल्स देताना पाहायला मिळाताय.
5 / 10
या फोटोंना कॅप्शन देताना अक्षयाने हार्दिकवरचं प्रेम व्यक्त केलं आहे.
6 / 10
तिने लिहलं, 'वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नवरोबा! तु माझ्या चेहऱ्यावर असलेल्या गोड हास्याचं सर्वात मोठं कारण आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. देव कायम तुझ्या पाठिशी आहे'.
7 / 10
अक्षयाच्या या पोस्टवर हार्दिकनेही कमेंट केली आहे. त्याने लिहलं, 'लव्ह यू माय वर्ल्ड'. तर हार्दिक आणि अक्षयाच्या चाहत्यांनीदेखील पोस्टवर कमेंट करत दोघांवर प्रेमाचा वर्षाव केलाय.
8 / 10
हार्दिक आणि अक्षया हे २ डिसेंबर २०२२ ला लग्नबंधनात अडकले होते. या दोघांची ऑफस्क्रिन केमेस्ट्रीदेखील भन्नाट आहे.
9 / 10
दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर हार्दिक अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. तर अक्षयाने नुकताच तिच्या साड्यांच्या नवीन व्यवसायाला सुरुवात केली आहे.
10 / 10
राणादा आणि पाठक बाई या जोडीला ऑनस्क्रीन जितकी पसंती मिळाली. तितकंच खऱ्या आयुष्यातही चाहते त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात. ही जोडी पुन्हा कधी एकत्र दिसणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीमराठी अभिनेता