Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनोज वाजपेयीची ‘रे’ या दिवशी होतेय रिलीज...! या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 17:43 IST

1 / 7
टू हॉट टू हँडल 2- ‘टू हॉट टू हँडल’ या मालिकेचा दुसरा सीझन येत्या 23 जूनला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या मालिकेचा पहिला सिझन प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.
2 / 7
गुड ऑन पेपर- गुड ऑन पेपर हा अमेरिकन सिनेमा येत्या 23 जूनला रिलीज होतोय. ज्याचे दिग्दर्शन किम्मी गेटवुडने केले आहे. एका स्टॅन्ड-अप कॉमेडीअनची प्रेमकथा यात तुम्हाला पाहायला मिळेल.
3 / 7
ग्रहण- ग्रहण ही वेबसीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर येत्या 24 जूनला रिलीज होणार आहे. ही सीरिज बोकारोमधील शीखविरोधी दंगलींवर आधारीत आहे.
4 / 7
माडथी- हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म नीस्ट्रीमवर 24 जून रोजी रिलीज होणार आहे. आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
5 / 7
सेक्स/लाइफ- सेक्स/लाइफ ही कॉमेडी ड्रामा सीरिज नेटफ्लिक्सवर 25 जून रोजी प्रदर्शित होईल.
6 / 7
धूप की दीवार - धूप की दीवार ही सीरिज येत्या 25 जून रोजी झी5 वर प्रदर्शित होणार आहे.
7 / 7
रे - सत्यजित रे यांनी लिहिलेल्या चार लघु कथांवर आधारीत रे ही सीरिज येत्या 25 जूनला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. यामध्ये मनोज बाजपेयी, गजराज राव, राधिका मदन, के के मेनन, हर्षवर्धन कपूर असे कलाकार आहेत. हा चित्रपट श्रीजित मुखर्जी, अभिषेक चौबे मुख्य भूमिकेत आहेत.
टॅग्स :मनोज वाजपेयीनेटफ्लिक्स