1 / 12मुंबईच्या बांद्रा परिसरात मलायका राहते. घर तर अतिशय आलिशान आहे. तिचे घर पाहून सा-यांचे डोळे दिपून जातील. मलायकाच्या याच आलिशान घराचे आतले फोटो खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.2 / 12 रियालिटी टीव्ही शो, मॉडेलिंग, ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आणि जाहिरातींच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावते. असे असले तरी कमीत कमी खर्चात कशा रितीने लाईफस्टाइल मेंटेन करता येईल यावरच मलायका जास्त लक्ष देते. आवश्यकतेपेक्षा अधिक खर्च करणे मलायकाला आवडत नाही.3 / 12मलायकाचे घर जास्त मोठं नसले तरी छोट्या जागेतही खूप आकर्षक असे इंटेरिअर केले आहे. शिवाय तिला वाचनाची आवड आहे. त्यामुळे घरात तिने खास बुक शेल्फ तयार करुन घेतले आहे.4 / 12तिच्या घराचे अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये ती घरात निवांत क्षण घालवताना पाहायला मिळत आहे. मलायका मुलगा अरहानसोबत या घरात राहते.5 / 12 घरावरुन तिचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल. घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी मलायकाने बरीच मेहनत घेतली आहे. अनेकदा घरातच योगा करताना दिसते.6 / 12कामातून वेळ मिळताच काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवते. स्वतःची कंपनी एन्जॉय करताना दिसते.7 / 12किचन एरियापासून ते लिव्हींग रुमपर्यंत घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी मलायकाने बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल. 8 / 12या फोटोजमध्ये ती घरात निवांत क्षण घालवताना पाहायला मिळत आहे.हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल.9 / 12घरातल्या इतर रुमपैकी मलायकाचे बेडरुमचे इंटेरिअरदेखील खूप चांगले आहे. घरातले फर्निचर जास्त करुन पांढ-या रंगाचेच आहेत. घरात चारही बाजुला मोठ मोठ आरसेही लावलेले दिसतील.10 / 12सोशल मीडियावर मलायका अनेकदा आपल्या घराचे फोटो शेअर करत असते. जितकं स्वतःकडे लक्ष देते तितकंच घराती बारकाईने लक्ष देत असल्याचे घराच्या फोटवरुन स्पष्ट होते.11 / 12 या घराला एक सुंदर बाल्कनी आहे. या बाल्कनीत अनेकदा क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना मलायका दिसते. 12 / 12मलायकाच्या घराची एंट्रीदेखील आकर्षक आहे. घराची एंट्रीमध्येच आकर्षक फुलांची सजावट केलेली असते. दिवाळी असो किंवा मग दुसरा कोणता सण मलायका तिच्या आवडत्या जागी नेहमीच फोटोशूट करताना दिसते.