1 / 7माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती असून या मालिकेत राधिकाची भूमिका अनिता दाते साकारत आहे.2 / 7अनिता या मालिकेत नेहमीच साडीत दिसत असली तरी ती तिच्या खाजगी आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.3 / 7अनिताने आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तिला खऱ्या अर्थाने ओळख ही माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने मिळवून दिली. या भूमिकेसाठी आजवर तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.4 / 7अनिताचे लग्न चिन्मय केळकरसोबत झाले असून चिन्मय देखील याच क्षेत्राशी संबंधित आहे. तो अनेक वर्षांपासून अनुराग कश्यपसोबत काम करत असून तो एक लेखक आहे.5 / 7ललित केंद्रात असतानाच चिन्मय आणि अनिताची ओळख झाली होती. पण त्यावेळी केवळ ते फ्रेंड्स होते. पण एका नाटकाच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. सिगारेट्स या नाटकाच्या तालमीच्या वेळी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याची त्यांना जाणीव झाली.6 / 7अनिता आणि चिन्मय नात्यात असले तरी चिन्मयला लगेचच लग्न करायचे नव्हते आणि त्याने ही गोष्ट स्पष्टपणे अनिताला सांगितली होती. त्यामुळे त्या दोघांनी लिव्ह इन मध्ये राहायला सुरुवात केली. दीड वर्षं ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते.7 / 7काही वर्षं लीव्ह इन मध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. त्यांच्या लग्नाला ११ हून अधिक वर्षं झाली आहेत.