1 / 10साऊथचा सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) सध्या बॉलिवूडबाबतच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. बॉलिवूड त्याला अफॉर्ड करू शकत नाही आणि त्याला हिंदी सिनेमे करून वेळ वाया घालवायचा नाहीये. आता त्याच्या या वक्तव्यानंतर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, साऊथचा हा सुपरस्टार किती मानधन घेतो जे बॉलिवूड त्याला देऊ शकत नाही. तो एका सिनेमासाठी किती मानधन घेतो? त्याची एकूण संपत्ती किती आहे? चला जाणून घेऊ....2 / 10महेश बाबूचा जन्म ९ ऑगस्ट १९७५ ला मद्रासच्या एका तेलुगू फॅमिलीत झाला होता. त्याचे वडील कृष्णा प्रसिद्ध अभिनेते होते. महेश बाबूचं बालपण त्याच्या आजी-आजोबांसोबत गेलं. कारण त्याचे वडील शूटिंगमध्ये बिझी राहत होते. त्याच्या शिक्षणावर त्याचा भाऊ रमेश बाबू लक्ष ठेवत होता. त्याने बी.कॉम केल्यावर तीन-चार महिने अभिनयाचं ट्रेनिंग घेतलं. 3 / 10महेश बाबूने वयाच्या ४ थ्या वर्षीय अभिनयाला सुरू केली होती. त्यानंतर त्याने बालकलाकार म्हणून ८ सिनेमात काम केलं. त्यानंतर १९९९ मध्ये त्याने हिरो म्हणून डेब्यू केलं होतं. त्याने आतापर्यंत २५ पेक्षा जास्त सिनेमात काम केलं आणि त्याचे प्रत्येक सिनेमे रेकॉर्ड बनवतात. टॉलिवूडचा प्रिन्स असं त्याच नामकरण करण्यात आलं आहे. तो या इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.4 / 10महेश बाबूला एका इव्हेंटमध्ये काही दिवसांपूर्वी विचारण्यात आलं होतं की, बॉलिवूडमध्ये डेब्यू कधी करणार आहेस? तेव्हा तो म्हणाला होता की, त्याला त्याच्याच इंडस्ट्रीत काम करायचं आहे. कारण त्याला त्याचं पूर्ण योगदान केवळ याचं इंडस्ट्रीला द्यायचं आहे. तो बॉलिवूडबाबत जे काही बोलला ते भुवया उंचावणारंच होतं.5 / 10४६ वर्षीय महेश बाबू आता म्हणाला की, बॉलिवूड त्याला अफॉर्ड करू शकत नाही आणि त्याला हिंदी सिनेमांवर त्याचा वेळ वाया घालवायचा नाहीये. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेश बाबू एका सिनेमासाठी आधी ५५ कोटी रूपये मानधन घेत होता. जे आता त्याने वाढवून ८० कोटी रूपये केलं आहे.6 / 10महेश बाबू लक्झरी लाइफ जगण्यासाठीही चर्चेत असतो. मीडिया रिपोर्टनुसार, त्याची नेटवर्थ १४९ कोटी रूपये इतकी आहे. त्याची महिन्याची कमाई २ ते ३ कोटी रूपये आहे. जी जास्तीत जास्त सिनेमातून होते. त्याशिवाय तो जाहिरातींमधूनही कमाई करतो. ज्यासाठी तो कोट्यावधी रूपये घेतो. असं सांगितलं जातं की, तो त्याच्या कमाईतील ३० टक्के भाग चॅरिटी करतो.7 / 10तेलुगू सुपरस्टार महेश बाबूचा हैद्राबादमध्ये आलिशान बंगला आहे. ज्यात स्वीमिंग पूल आणि काही एकराचं गार्डन आहे. अनेक महागड्या वस्तू त्याच्या घरात आहेत. त्याच्या या बंगल्याची किंमत २८ कोटी रूपये असल्याचं बोललं जातं.8 / 10भलेही महेश बाबूने म्हटलं की, तो हिंदी सिनेमात काम करणार नाही. पण तो बॉलिवूड स्टारसोबत कनेक्टेड आहे. त्याने २०१३ मध्ये फरहान अख्तरचं एक कॅम्पेन जॉइन केलं होतं. जावेद अख्तर यांच्या एका कवितेला त्याने तेलुगूमध्ये आपला आवाज दिला होता. 9 / 10महेश बाबूकडे अनेक लक्झरी कार्सही आहे. त्याच्याकडे २.४० कोटी रूपयांची रेंज रोव्हर, १.३५ कोटी रूपयांची बीएमडब्ल्यू, १.४७ कोटी रूपयांची लॅंड क्रूजर आणि ९० लाख रूपयांची एसयूव्ही आहे.10 / 10महेश बाबू नेहमीच त्याच्या पर्सनल लाइफबाबत चर्चेत राहतो. तो ऑस्ट्रेलियामध्ये Vasmi सिनेमाच्या शूटिंग दरम्यान को-स्टार नम्रता शिरोडकरला डेट करू लागला होता. चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांनी २००५ मध्ये लग्न केलं. त्यांना एक मुलगा गौतम आणि मुलगी सितारा आहे.