Join us
Daily Top 2Weekly Top 5

Photos: जपानमध्ये 'धकधक गर्ल'चं खास फोटोशूट, पतीसोबत माउंट फूजीवर केली धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 13:56 IST

1 / 9
बॉलिवूडची धकधक गर्ल आणि आपली मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने हे पॉवर कपल आहेत. वयाच्या साठीतही दोघं कपल गोल्स देतात.
2 / 9
सध्या माधुरी आणि डॉक्टर नेने जपानमध्ये फिरण्याचा आनंद लुटत आहेत. तेथील प्रसिद्ध माउंट फूजीवर ते पोहोचले. तिथलं डोळे दिपवणारं दृश्य त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दाखवलं आहे.
3 / 9
मागे माउंट फूजीचा तो भव्य बर्फाच्छादित डोंगर आणि समोर माधुरी पतीसोबत पोज देत आहे. दोघांनी उबदार कपडे परिधान केले आहेत.
4 / 9
माधुरीने उबदार स्कार्फ ओढला आहे. लाईट कलरचा स्वेटशर्ट घातला आहे. डोळ्यावर गॉगल आणि चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच गोड स्माईल आहे.
5 / 9
तर डॉ श्रीराम नेनेही कॅज्युअल अंदाजात दिसत आहेत. फुल टीशर्ट, जीन्स आणि गॉगलमध्ये त्यांचा स्मार्ट लूक दिसत आहे.
6 / 9
दोघांनी हातात हात घेत मस्त पोजही दिली आहे.
7 / 9
तसंच तेथील प्रसिद्ध पॅगोडासमोरही त्यांनी फोटोशूट केलं आहे. माधुरी लिहिते, 'अॅक्टिव्ह ज्वालामुखीच्या शिखरावरुन दिसणारे दृश्य जे परंपरांनी नटलेलं, परिसरातील अनेक मंदिरांमुळे प्रसन्न असलेलं, बर्फाने आच्छादलेलं आणि जपानच्या समुराईने नटलेलं आहे.'
8 / 9
विशेष म्हणजे माधुरी आणि पतीने जपानची पारंपरिक वेशभूषाही परिधान केली आहे. माधुरीने केशरी रंगाचा पारंपरिक लांब बाह्यांचा 'युकाटा' घातला आहे.
9 / 9
या लूकमध्ये दोघांनी एकापेक्षा एक पोजही दिल्या आहेत. जपानमध्ये समुराई हा शब्द ऐतिहासिक योद्धा वर्गाशी निगडित आहे. यामुळे डॉ नेनेंनी हातात ती खास तलवारही घेतलेली दिसत आहे.
टॅग्स :माधुरी दिक्षितबॉलिवूडजपान