1 / 11बॉलिवूडची 'एव्हरग्रीन' अभिनेत्री आणि जिच्या एका हास्यावर लाखो फिदा आहेत, अशी माधुरी दीक्षित आज १५ मे रोजी आपला ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे.2 / 11साठीच्या उंबरठ्यावर असूनही माधुरीचे सौंदर्य आणि ऊर्जा आजही तरुणींना लाजवेल अशीच आहे. तिच्या चेहऱ्यावरील तेज आणि तिचं ग्रेसफुल व्यक्तिमत्व तितकंच ताजंतरुण दिसतं.3 / 11जगभरातील कित्येकांसाठी माधुरी 'क्रश' असली तरी, स्वतः माधुरी कोणाच्या प्रेमात वेडी होती, हे तुम्हाला माहिती आहे का? आज तिच्या वाढदिवसानिमित्त याबद्दल जाणून घेऊया. 4 / 11माधुरीने १९८४ मध्ये 'अबोध' चित्रपटातून पदार्पण केले आणि त्यानंतर तिने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. तिचा चाहतावर्ग जगभरात निर्माण झाला होता.5 / 11माधुरीवर जीव ओवाळून टाकणाऱ्या चाहत्यांची संख्या लाखात नाही, तर करोडोंमध्ये होती. अनेक अभिनेत्यांसोबत तिचं नाव जोडलं गेलं. पण, माधुरीचं मन एका प्रसिद्ध क्रिकेटरसाठी धडधडत होतं.6 / 11अनेकांना वाटतं की माधुरीचा क्रश एखादा मोठा अभिनेता असेल, पण तसे नाही. ९० च्या दशकात माधुरी एका क्रिकेटपटूची जबरी चाहती होती. 7 / 11हा खेळाडू माधुरीपेक्षा वयाने १७ वर्षांनी मोठा होता. १९९२ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत माधुरीने स्वतः याचा खुलासा केला होता.8 / 11माधुरी म्हणाली होती, 'मी त्यांची खूप मोठी चाहती आहे. ते खूप हँडसम आहेत. मला त्यांच्या मागे धावावंसं वाटतं आणि ते माझ्या स्वप्नातही येतात'.9 / 11 माधुरीचा हा क्रश दुसरा कोणी नसून भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर होते. त्यावेळी माधुरीच्या या विधानाची प्रचंड चर्चा झाली होती.10 / 11दरम्यान, कारकिर्दीच्या शिखरावर असताना माधुरीचे नाव अभिनेता संजय दत्तसोबत जोडले गेले होते. ते लग्नही करणार असल्याची चर्चा होती. पण, त्यांचे नाते पुढे संपुष्टात आले.11 / 11अखेर माधुरीने १७ ऑक्टोबर १९९९ रोजी डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून आपला संसार थाटला. या दाम्पत्याला दोन मुले असून अरिन आणि रेयान ही त्यांची नावे आहेत. अरिनचा जन्म २००३ मध्ये तर रेयानचा जन्म २००५ मध्ये झाला.