By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 08:00 IST
1 / 1114 जुलै 1971 साली नागपुरात जन्मलेली मधु सप्रे तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जायची.2 / 11मधु एकेकाळी सुपरमॉडेल म्हणून ओळखली जायची. पण खरे ती अॅथलिट होती.3 / 1190 च्या दशकात फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांची नजर मधुवर पडली आणि त्यांनी तिला एका फोटोशूटसाठी सिलेक्ट केले होते.4 / 1119 व्या वर्षी मधुने फोटोशूट केले आणि यानंतर तिने मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला.5 / 11मॉडेल म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणा-या मधुने 1992 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला. पण मिस युनिव्हर्स स्पर्धेत एका उत्तराने तिला आपला मुकुट गमावावा लागला होता. 6 / 11तु देशाची पंतप्रधान बनलीस तर काय करशील? असा प्रश्न या स्पर्धेच्या फायनल राऊंडमध्ये तिला विचारण्यात आला होता. यावर मला भारतात एक मोठे स्टेडियम बनवायला आवडेल असे उत्तर तिने दिले होते. भारतात खेळाडूंना सराव करण्यासाठी मैदाने नाहीत, असे ती म्हणाली होती. या असामान्य उत्तरामुळेच मधुने मुकुट गमावला अशी चर्चा त्यावेळी झाली होती. अर्थात, मनापासून जे वाटले तेच उत्तर दिल्याने आपणास खंत नाही, असेही तिने म्हटले होते.7 / 11 मधु सप्रेची एक जाहिरात चांगलीच वादग्रस्त ठरली होती. 1995 मध्ये एका शूज तयार करणाºया एका कंपनीने मधु व मिलिंद सोमण या दोघांना घेऊन एक न्यूड जाहिरात तयार केली होती. या जाहिरातीची गणती आतापर्यंतच्या सर्वात वादग्रस्त जाहिरातींमध्ये होते.8 / 11मधु आणि मिलिंद या जाहिरातीमध्ये न्यूड झाले होते. पायात बुट आणि गळ्यात अजगर असे हे फोटोशूट होते. या न्यूड जाहिरातीवरून प्रचंड वाद झाला होता. मुंबई पोलिसांनी आॅगस्ट 1995 मध्ये मधु व मिलिंदविरोधात गुन्हाही दाखल केला होता.9 / 11जाहिरातीत अजगराच्या वापरावरही टीका झाली होती. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्टअंतर्गत संबंधित जाहिरात कंपनीविरोधातही गुन्हा दाखल केला गेला होता. तब्बल 14 वर्षे हा खटला सुरु होता. अखेर 14 वर्षांनी मिलिंद व मधु दोघांनाही निर्दोष ठरवले गेले होते.10 / 11अधूनमधून भारतातील फॅशन शोज आणि पेज थ्री पार्टीजमध्ये मधु दिसत असते.11 / 11मधुने इटलीतील आयस्क्रिम बिझनेसमॅन जिआर मारियासह लग्न केले आणि आपल्या कुटुंबीयांसह इटलीत स्थायिक झाली.