नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या घटस्फोटाचे वेगळेच कारण आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 12:29 IST
1 / 10हे दोघे घटस्फोट घेणार याच बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता.त्यानंतर दोघांनीही ते घटस्फोट घेतल्याचे जाहिर केले होते. 2 / 10तेव्हापासून चाहते या दोघांच्या घटस्फोटाचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. रोज नवीन नवीन कारणं समोर येत होती. 3 / 10आता पुन्हा एकदा दोघांच्या घटस्फोटाचे नवीन कारण समोर आले आहे. मुळात नागा चैतन्यने याविषयी मनमोकळेपणाणे बोलणे नेहमीच टाळले होते.4 / 10आता दिलेल्या एका मुलाखतीत त्याने यावरुन आपले मौन सोडले आहे. त्यांच्या नाते तुटण्याला कारणीभूत समंथा असल्याचे त्याने म्हटले आहे. 5 / 10मुळात लग्नानंतर समंथाचे करिअर सुस्साट सुरु होते. त्यातही बोल्ड भूमिका साकारणे नागा चैतन्य आणि कुटुंबाला खटकत होते. 6 / 10अनेकदा नागा चैतन्य आणि कुटुंबाने समंथाला समजवण्याचा प्रयत्न केला. 7 / 10मुळात अक्किनेनी घराची सून बनल्यानंतर समांथाने सासू अमाला अक्किनेनीसारखेच वागायला हवे अशी सगळ्यांची अपेक्षा होती.8 / 10पण समंथा मात्र कुटुंबाच्या अटी मान्य नव्हत्या. शेवटी दोघांच्या नात्यातही फुट पडायला सुरुवात झाली आणि घटस्फोट हाच पर्याय दोघांपुढे होता. 9 / 10लग्नापूर्वी काही वर्ष दोघेही एकमेकांना डेट करत होते. चार वर्ष दोघांचे अफेअर सुरु होते. त्यानंतरच दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.10 / 106 अक्टूबर 2017 मध्ये हे कपल लग्नबंधनात अडकले होते.