1 / 9मिस मेक्सिको अँड्रिया मेजाने मिस युनिव्हर्स 2020 चा ताज पटकावला. तर भारताचे प्रतिनिधित्व करणारी 22 वर्षीय अॅडलिन कॅसलिनो हिला ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत तिस-या स्थानावर समाधान मानावं लागलं.2 / 9एकार्थाने भारताची अॅडलिन हरली. पण या स्पर्धेपर्यंत पोहोचण्यासाठी तिने केलेला संघर्ष बघता, तुम्हीही तिच्या जिद्दीला सलाम कराल.3 / 9‘मिस युनिव्हर्स’पर्यंत पोहोचलेली अॅडलिन जन्मली कुवैतमध्ये. मग ती भारतात कशी पोहोचवली आणि मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कसे केले, याची स्टोरी रोमांचक आहे.4 / 9कुवैतमध्ये जन्मली असली तरी अॅडलिनचे आईवडील कर्नाटकचे. अॅडलिनची आजी शेतकरी होती. म्हणजे, मुळात अॅडलिन कोण तर कर्नाटकाच्या शेतकरी कुटुंबातील एक सामान्य मुलगी.5 / 9कुवैतमध्ये लहानाची मोठी होत असताना अॅडलिनला फक्त एकच ध्यास होता, तो म्हणजे सौंदर्य स्पर्धेचा.6 / 9कुवैतमध्ये संधी नव्हती़ स्वत: ला स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने तिने भारतात येण्याचे ठरवले आणि ती आली.7 / 9मिस युनिव्हर्सचा ताज तिला खुणावत होता. पण या मार्गात अनेक अडचणीही होत्या. शरीरावर डाग होते. धड बोलताही येत नव्हतं. आपल्यासारख्या मुलीला जिला चांगलं बोलता येत नाही, तिच्या शरीरावर डाग आहेत, तिला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल, असा विचारही तिने केला नव्हता.8 / 9पण वयाच्या 15 व्या वर्षी अॅडलिन भारतात आली. पुढे मॉडेलिंग क्षेत्रात गेली़ यादरम्यान तिला अनेकदा रनवेवर चालण्याची संधी मिळाली. अनेक मॅगझिनच्या कव्हरपेजवर ती झळकली. अनेक टीव्ही व डिजीटल कॅम्पेनमध्ये मॉडेल म्हणून झळकली.9 / 9मिस युनिव्हर्स 2020 आधी तिने मिस दिवा युनिव्हर्स 2020 ही स्पर्धा जिंकली.