By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 11:58 IST
1 / 10शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ची हिरोईन कियारा अडवाणी आज 30 वर्षांची झाली. होय, आज कियारा तिचा वाढदिवस साजरा करतेय. 31 जुलै 1992 रोजी जन्मलेली कियारा बॉलिवूडमध्ये आली आणि फारच थोड्या दिवसांत तिने आपली स्वत:ची एक ओळख निर्माण केली.2 / 10आज कियारा बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. कियाराने मुंबईत शिक्षण पूर्ण केलं आणि ती मॉडेलिंगच्या दुनियेत आली. यानंतर बॉलिवूडमध्ये तिची एन्ट्री झाली.3 / 10कियाराचं खरं नाव आलिया आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक असावं. बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याआधी कियाराने तिचं नाव बदललं. सलमान खानने तिला नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.4 / 10नाव बदलण्यामागचं कारण होती आलिया भट. होय, कियारा बॉलिवूडमध्ये येण्याआधीच आलिया भट इंडस्ट्रीत दाखल झाली होती आणि हिट होती. अशात कियाराला सलमान नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.5 / 10कियारा हे नाव तिने स्वत:साठी कसं निवडलं तर ‘अंजाना अंजानी’ हा चित्रपट पाहून. होय, या चित्रपटात प्रियंका चोप्राने कियारा नावाचं पात्र साकारलं होतं. हे नाव आवडलं आणि कियाराने तेच नाव स्वत:साठी निवडलं.6 / 10कियाराच्या नेटवर्थबद्दल सांगायचं तर तिच्याकडे 23 कोटींची प्रॉपर्टी आहे. रिपोर्टनुसार, तिच्या कमाईत दरवर्षी सुमारे 25 टक्क्यांची वाढ होत आहे.7 / 10कियारा प्रमोशन व जाहिरातींतून मोठी कमाई करते. दरमहिन्याला 30 ते 40 लाख ती यातून कमावते. एका जाहिरातीसाठी ती 20 ते 25 लाख घेते.8 / 10कियाराचे सोशल मीडियावर लाखों फॉलोअर्स आहेत. ब्रँड प्रमोशनसाठीही ती लाखो रूपये घेते. कियारा अलिशान घरात राहते. मुंबईत तिचं एक अलिशान अपार्टमेंट आहे.9 / 10तिच्या या अपार्टमेंटची किंमत 14 ते 15 कोटी रूपये आहे. तिच्याकडे मर्सिडीज बेंज E220D ही कार आहे. तिच्याकडे एक बीएमडब्ल्यू कारही आहे.10 / 10सध्या कियारा सिद्धार्थ मल्होत्राला डेट करतेय. काही दिवसांआधी दोघांचं ब्रेकअप झाल्याची खबर आली होती. पण आजचा वाढदिवस कियारा सिद्धार्थसोबत साजरा करतेय. दोघंही दुबईत आहेत.