1 / 9‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीत राहणारे जेठालाल,भिडे, माधवी, कोमल, बबिता, अंजली ही सर्वच पात्र खूप प्रसिद्ध आहेत. पण, त्यातील पोपटलाल हे पात्र खूपच रंजक आहे.2 / 9 लग्नाचं वय उलटूनही अद्याप बोहल्यावर न चढल्याने पोपटलाल कावराबावरा झालेला आपल्याला दिसतो. त्यातून विनोदाचे अनेक पंच आपल्याला पाहायला मिळतात. असा हा पोपटलाल लवकरच बोहल्यावर चढणार आहे. 3 / 9होय, अनेक वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या पोपटलालचं लग्न होणार आहे. मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये पोपटलालचं लग्न दाखवलं जाणार आहे आणि त्यासाठी मालिकेत एक नवी एन्ट्री झाली आहे.4 / 9होय, खुशबू पटेल ही मालिकेत प्रतीक्षाचं पात्र साकारते आहे आणि हीच प्रतीक्षा पोपटलालची पत्नी बनणार आहे. तिने शूटींगही सुरू केलं आहे.5 / 9अलीकडच्या काही एपिसोडमध्ये पोपटलालच्या या होणाऱ्या नवरीला तुम्ही भेटला असालच. पण खऱ्या आयुष्यात ती कोण आहे, काय करते, हे कदाचित तुम्हाला माहित नसेल.6 / 9प्रतीक्षाची भूमिका साकारणारी खुशबू पटेल ही एक अभिनेत्री व मॉडेल आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड अॅक्टिव्ह आहे. इन्स्टावर तिचे 19.4 के फॉलोअर्स आहेत.7 / 9खुशबू रिअल लाईफमध्ये प्रचंड स्टायलिश आहे. तिला भटकंतीची आवड आहे. इन्स्टावर तिचे अनेक व्हॅकेशन फोटो उपलब्ध आहेत.8 / 9भारतीय पारंपरिक पोशाखात ती सुंदर दिसतेस. पण वेस्टर्न कपड्यांमध्येही ती स्टायलिश दिसते. तिची स्टाईल बघता ती बबीताला तगडी टक्कर देणार, असं दिसतंय.9 / 9तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये खुशबू कायमस्वरूपी आली की तिची एन्ट्री काही दिवसांसाठीच आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण मालिकेतील अनेक कलाकार मालिका सोडून जात असताना हे तिचं पात्र काहीतरी इंटरेस्टिंग करणार, असं एकूण वाटतंय.