Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधी रिक्षातून फिरायचा, आता स्टार झाल्यावर राग आला की थेट खरेदी करतो नवी कार? कोण आहे हा अवलिया?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 16:17 IST

1 / 7
असाच एक अभिनेता जो पहिल्याच सिनेमातून स्टार झाला. मात्र त्याआधी त्याने मुंबईत बरंच स्ट्रगल केलं. तो अभिनेता आज राग आला की चक्क नवीन कार खरेदी करतो. कोण आहे हा अवलिया कलाकार?
2 / 7
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. पैसा, प्रसिद्धी मिळाल्यानंतर या कलाकारांनी आपली गाड्यांची हौस पूर्ण करुन घेतली.
3 / 7
कधीकाळी मुंबईत रिक्षा, टॅक्सीने फिरणारा हा अभिनेता आहे कार्तिक आर्यन (Kartik Aryan). आज त्याच्याकडे लॅम्बॉर्गिनी, रेंज रोव्हरसारख्या गाड्या आहेत. कार्तिक आपलं फ्रस्ट्रेशन दूर करण्यासाठी लक्झरी गाड्या खरेदी करतो.
4 / 7
कार्तिकने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. नुकताच त्याचा 'चंदू चॅम्पियन' तुफान गाजला. नुकतंच तो एका मुलाखतीत म्हणाला, 'करिअरच्या सुरुवातीला लक्झरी कार घेणं एवढी माझी क्षमता नव्हती. मी पहिली कार ३५ हजार रुपयांना खरेदी केली होती. ही थर्ड हँड कार होती.'
5 / 7
'यानंतर करिअरमध्ये यश मिळाल्यानंतर मी पहिली लक्झरी कार घेतली जी लॅम्बॉर्गिनी होती. मी नेहमी सेकंड किंवा थर्ड हँड कारच घ्यायचो. कारण तीच बजेटमध्ये असायची. '
6 / 7
तो म्हणाला, 'मला स्वत:ला आधी कार घेता येत नव्हती तेव्हाच मी ठरवलं की एक ना एक दिवस मी नक्कीच घेईन. मला वाटतं कधी कधी मी फ्रस्ट्रेशन दूर करण्यासाठी कार घेतो आणि माझंच मला हे समजत नाही. कारण याआधी मी अनेकदा रेड कार्पेट, अवॉर्ड शोजना मी रिक्षाने गेलो आहे.'
7 / 7
कार्तिकने २०११ साली 'प्यार का पंचनामा' मधून एन्ट्री केली. आता तो आगामी 'भूलभुलैय्या ३' मध्ये दिसणार आहे. तसंच 'आशिकी 3' मध्येही त्याची वर्णी लागली आहे.
टॅग्स :कार्तिक आर्यनबॉलिवूडकारलँबॉर्घिनी