SEE PICS : चित्रपट न करताही करिश्मा कपूर कशी जगते इतके अलिशान आयुष्य?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 08:00 IST
1 / 1090 च्या दशकात करिश्मा कपूरचा बॉलिवूडमध्ये चांगलाच दबदबा होता. मात्र लग्नानंतर करिश्मा अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. म्हणायला काही वेबसीरिज व जाहिरातीत ती दिसते. पण ते पुरेसे नाही,अशात लोलो इतके लक्झरी आयुष्य जगते तरी कसे? असा प्रश्न चाहत्यांना साहजिकच पडतो.2 / 10हा प्रश्न पडणा-यांना हे माहित नसावे की, करिश्मा उत्तम अभिनेत्री असल्यासोबत एक उत्तम बिझनेस वुमनही आहे. 3 / 10 वेगवेगळ्या ब्रँडमध्येही करिश्माने गुंतवणूक केली आहे. या माध्यमातून तिला चांगले उत्पन्न मिळते. इतकेच नाही तर पूर्वाश्रमीचा पती संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मिळालेल्या पोटगीच्या रकमेतूनही ती आजही आलिशान आयुष्य जगते.4 / 10करिश्मा आपल्या दोन मुलांसोबत मुंबईच्या खारस्थित फ्लॅटमध्ये राहते. घटस्फोटानंतर संजयने हा फ्लॅट तिला दिला होता.5 / 10मीडिया रिपोर्टनुसार, संजयने आपल्या मुलांच्या नाव 14 कोटींचे बॉन्ड खरेदी केले आहेत. याच्या व्याजापोटी करिश्माला महिन्याला 10 लाख मिळतात.6 / 10करिश्माची दोन्ही मुलं मुंबईच्या धीरूभाई अंबानी शाळेत शिकतात. हे देशातील सगळ्यात महागडे स्कूल आहे. मुलांचा सर्व खर्च संजय कपूर करतो.7 / 10करिश्मासोबत घटस्फोट झाला असला तरी मुलांसोबत संजयचा चांगला बॉन्ड आहे. मुलं अनेकदा त्याच्यासोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसतात.8 / 10करिश्माला घटस्फोट दिल्यानंतर संजयने प्रिया चटवालसोबत लग्न केले. 9 / 102016 मध्ये करिश्मा व संजय कपूरचा घटस्फोट झाला. यासाठी तिला बरीच मोठी कायदेशीर लढाई लढावी लागली होती.10 / 10आता करिश्मा सिंगल मॉम आहे आणि बॉलिवूडची परफेक्ट सिंगल मॉम म्हणून तिला ओळखले जाते.