Join us
Daily Top 2Weekly Top 5

उशीरा लग्न केल्यामुळे ३९ वर्षीय अभिनेत्रीला होतोय पश्चाताप?, इंटिमेट सीनवर पतीनं दिलेल्या रिअ‍ॅक्शनबाबत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 14:18 IST

1 / 7
करिश्मा तन्ना आता ३९ वर्षांची झाली आहे आणि पतीसोबत मॅरिड लाईफ एन्जॉय करतेय. याची झलक तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिसते. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 7
करिश्मा म्हणते की, आम्ही आमच्या नात्यातील चढ-उतार उत्तम प्रकारे हाताळतो. वरुण आणि माझ्यामध्ये काही अडचण असेल तर ती कशी हाताळायची हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 7
करिश्मा म्हणते, वरुण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. इंटिमेट सीन करताना वरुण माझ्याबद्दल काय विचार करेल याचा मी कधीच विचार करत नाही, पण मी नेहमीच एक रेष आखून घेतली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 7
करिश्मा आणि वरुणची पहिली भेट एका पार्टीत झाली, पहिल्याच भेटीत दोघांना एकमेकांचा स्वभाव आवडला. हळूहळू गप्पा, मग मैत्री आणि नंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दीड वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 7
करिश्माचा पती वरूण बंगेरा एक बिझनेसमॅन आहे. तो मुंबईचा राहणारा असून सध्या व्हीबी क्रॉप नामक कंपनीचा डायरेक्टर आहे. त्याने कॅनडाच्या ओटावा युनिव्हर्सिटीतून इंटरनॅशनल बिझनेसमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 7
करिश्मा तन्नाने आजवर क्योंकी साँस भी कभी बहू थी, कही तो मिलेंगे, देस में निकला होगा चाँद, शरारत, कुसूम, जोर का झटका, कॉमेडी नाइट्स विद कपिल, नच बलिए 7 आणि फियर फॅक्टर : खतरों के खिलाडी अशा अनेक शोमध्ये काम केलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 7
2013 साली तिने ‘ग्रँड मस्ती’चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. रणबीर कपूरच्या ‘संजू’ या सिनेमातही ती झळकली होती. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :करिश्मा तन्नाटिव्ही कलाकार