1 / 102 / 10हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल खास दाखवू शकला नाही, पण करिनाला एकापाठोपाठ एक अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. त्याच काळात करिनाने हृतिक रोशनसोबत अनेक चित्रपट केले. 3 / 10'कभी खुशी कभी गम', 'मुझसे दोस्ती करोगे', 'मैं प्रेम की दीवानी हूं', 'यादीं' यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघे एकत्र दिसले होते. त्यांची केमिस्ट्रीही लोकांना खूप आवडली.4 / 10करिना आणि हृतिक रोशन या जोडीने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल केली होती. त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले. अशात दोघांमध्ये अफेअर सुरू असल्याचीही चर्चा सुरू होती. 5 / 10करिना हृतिकसाठी वेडी झाली होती. प्रकरण इतके पुढे गेले होते की हृतिकच्या कुटुंबीयांना मध्ये पडून दोघांना वेगळं करावं लागलं होतं.6 / 10त्यावेळी करिनाने एका मुलाखतीत हृतिक रोशनसोबतच्या नात्याबाबत चर्चा केली होती. त्यावेळी अभिनेत्री रागात म्हणाली होती की, आता तिला अशाप्रकारच्या अफवांपासून ब्रेक हवा आहे. 7 / 10करिना म्हणाली होती की, ती कधीही कोणत्याही विवाहित पुरूषाच्या प्रेमात पडलेली नाही आणि ती कधीही विवाहित पुरूषासोबत अफेअर करणार नाही.8 / 10करिना असंही म्हणाली होती की, विवाहित पुरूष तिच्या करिअरसाठी हानिकारक आहेत. तिला आणि हृतिकला निर्माते, दिग्दर्शक साइन करतात कारण ते एक हॉट जोडी आहे. त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडते.9 / 10 करिना म्हणाली होती की, तिला चिंता आहे की, या अफवांचा प्रभाव हृतिक आणि सुझेनच्या वैवाहिक जीवनावर होऊ नये.10 / 10करिनाच्या या खुलाशानंतर तिच्या आणि हृतिकच्या अफेअरच्या अफवा बंद झाल्या होत्या. त्यानंतर दोघांनी सोबत कामही केलं नाही. दावा केला जातो की, या अफवांमुळेच तिने हृतिकसोबत काम करणं बंद केलं होतं.