Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनालीच्या पर्वतांमध्ये वसलाय कंगना राणौतचा बंगला, पहा या आलिशान बंगल्याचे INSIDE PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 13:42 IST

1 / 14
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत सध्या चर्चेत आली आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे तिला टीकेचा सामना करावा लागतो आहे. लॉकडाउनपासून मनाली येथील घरी कंगना आहे. ९ सप्टेंबरला मुंबई महापालिकेने ऑफिसवर कारवाई केल्यानंतर कंगना मुंबईत परतली होती. त्यानंतर पुन्हा ती मनालीला रवाना झाली आहे. सध्या ती तिच्या घरात क्वारंटाइन आहे.
2 / 14
मनालीतला कंगनाचा बंगला खूप सुंदर आणि आलिशान आहे.
3 / 14
कंगनाच्या घरात एकूण आठ बेडरुम आहे. गेस्ट रुममध्ये ऑरेंज लेनकडून डिझाइन करण्यात आले आहे.
4 / 14
कंगनाने तिच्या बंगल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. पर्वतावर वसलेल्या कंगनाच्या घरातून पर्वत आणि निसर्गरम्य दृश्य पहायला मिळते.
5 / 14
या सर्वात अत्याधुनिक सुविधा आहेत.
6 / 14
घरातील सर्व खोल्या दुबई स्टाइलमध्ये बनल्या आहेत.
7 / 14
कंगनाच्या बेडरूमला क्लासिकल टचसोबत मॉडर्न लूक देण्यात आला आहे.
8 / 14
सोबतच आर्मचेअर आणि जयपूर रग्स कार्पेट वापरण्यात आले आहे.
9 / 14
बेडरूमच्या प्रवेशद्वारावर अनोख्या वस्तूंचा वापर करण्यात आलाय.
10 / 14
सजावटीसाठी देशातील कित्येक राज्यांमधून सामान मागवले आहे.
11 / 14
कंगनाचा जेव्हा क्वीन चित्रपट हिट झाला होता तेव्हा तिने विचार केला होता की मनालीमध्ये एक आलिशान बंगला बनवणार. तिने २०१८ साली गृह प्रवेश केला होता.
12 / 14
बंगल्यात डायनिंग रुमसोबत फायर प्लेस आणि जिमदेखील आहे. घरात कंगनाने योग रुमदेखील बनवला आहे.
13 / 14
कंगनाने घराच्या छताला टॉप ग्लास रुफ लावले आहेत. आलिशान बंगला बनवण्यासाठी ३० कोटी रुपये खर्च केले आहेत. कंगनाने ही जमीन १० कोटी रुपयात खरेदी केली होती आणि मग आपल्या आवडीप्रमाणे घर बनविले होते.
14 / 14
खासगी जीवनाबद्दल सांगायचं तर कंगनाचे वडील अमरदीप राणौत एक बिझनेसमन आहेत. तिची आई आशा राणौत स्कूल टीचर आहे. तिची मोठी बहिण रंगोली चंडेल तीची मॅनेजर म्हणून काम पाहते. कंगनाला छोटा भाऊदेखील आहे ज्याचे नाव अक्षत राणौत आहे.
टॅग्स :कंगना राणौत