"आमच्या लाडक्या सुशांतसोबत काय झालं हे आम्हाला जाणून घ्यायचंय"; बहिणीची आर्त साद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 17:32 IST
1 / 10दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे. मात्र आपल्याला न्याय मिळेल, असा विश्वास कुटुंबीयांना आहे. एक दिवस सत्य बाहेर येईल, अशी त्यांना आशा आहे. 2 / 10सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्ती सध्या भारतात आहे. आपल्या भावाला न्याय मिळावा यासाठी तिने नेहमीच पावलं उचलली आहेत. नुकत्याच झालेल्या संभाषणात श्वेताने तिच्या 'पेन: ए पोर्टल को एनलाइटनमेंट' या पुस्तकाबद्दल आणि भाऊ सुशांतबद्दल सांगितलं आहे. 3 / 10श्वेताने हे पुस्तक लॉन्च केलं असून त्यात तिने तिच्या भावाविषयी लिहिलं असल्याचं म्हटलं आहे. श्वेता अनेकदा सुशांतशी संबंधित खास आठवणी शेअर करत असते. इंस्टंट बॉलीवूडशी बोलताना श्वेताने सुशांतसोबत नेमकं काय झालं हे आम्हा सर्वांना जाणून घ्यायचं असल्याचं सांगितलं.4 / 10'आमच्या लाडक्या सुशांतसोबत काय झालं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि हे सर्वांनाच जाणून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे समजत नाही तोपर्यंत आपल्याला न्यायासाठी आवाज उठवत राहावं लागेल.'5 / 10'तपास करत राहा असं सीबीआयला सतत सांगत राहावं लागेल, जेणेकरून लवकरात लवकर रिजल्ट समोर येतील' श्वेताने म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी श्वेतानेसुशांतच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती. 6 / 10'माझ्या भावाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सदैव तुझ्यावर प्रेम करत राहू. आशा आहे की तू कोट्यवधी लोकांच्या हृदयात सदैव जिवंत राहशील आणि त्यांना चांगलं काम करण्यासाठी प्रेरित करत राहशील' असं श्वेताने म्हटलं होतं. 7 / 10‘पवित्रा रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतवर आजही चाहते तितकंच प्रेम करतात. ‘एम,एस.धोनी’, ‘काय पोछे’ यांसारख्या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 8 / 102020 मध्ये सुशांतने टोकाचं पाऊल उचललं, आत्महत्या करत जीवन संपवलं. मुंबईतील राहत्या घरी सुशांतने गळफास घेतला होता. त्याच्या आत्महत्येने सर्वांनाच फार मोठा धक्का बसला. 9 / 1010 / 10