जान्हवी कपूरने बहीण खुशीसोबत वाळवंटात केलं बोल्ड फोटोशूट, अदा अशा की, नजर हटणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 16:23 IST
1 / 8जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती तिची बहीण खुशी आणि मित्रासोब दुबईच्या वाळवंटात फिरत आहेत. जान्हवी ब्राउन टॅंक टॉप आणि शॉर्ट्स घालून डेजर्ट राइड एन्जॉय करताना दिसत आहे. खुशीने जान्हवीसारखे ब्राउन टॅंक टॉप आणि ब्लॅक शॉर्ट्स घातले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 2 / 8बोनी कपूर (Boney Kapoor) आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची मुलगी जान्हवी कपूर सध्या शूटींग सोडून व्हेकेशनच्या मूडमध्ये आहे. आधी सारा अली खान (Sara Ali Khan) सोबत केदारनाथला गेली होती. आता ती बहीण खुशीसोबत दुबईच्या वाळवंटात फिरत आहे. 3 / 8जान्हवी कपूरने दुबई ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात ती लहान बहीण खुशी कपूरसोबत वाळवंटात ग्लॅमरस तडका लावताना दिसत आहे.4 / 8जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर या ट्रिपचे सगळेच फोटो पोस्ट केले आहेत. यात ती फारच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत एक मित्रही आहे.5 / 8जान्हवी कपूरचे लेटेस्ट फोटो पाहून सोशल मीडियावर फॅन्स आणि तिचे फ्रेन्ड्सही कमेंट्स करत आहेत. जान्हवीचे हे फोटो पाहून तिचा एक्स रूमर्ड बॉयफ्रेन्ड शिखर पहरिया याने सुद्धा कमेंट केली आहे. त्याने कमेंट करत लिहिले की, ''माशाल्लाह'. 6 / 8जान्हवी कपूर आणि खुशी कपूरच्या फोटोंवर त्यांचे काका म्हणजे अभिनेता संजय कपूर यानेही कमेंट केली. तसेच आलिया कश्यप, अंशुला कपूरने इमोजीने कमेंट केली आहे.फोटो साभार-@janhvikapoor/Instagram7 / 88 / 8