1 / 8बॉलिवूडमध्ये असे अनेक चेहरे आहेत, ज्यांना इंडस्ट्रीत खूप नाव आणि प्रसिद्धी मिळाली, पण करिअरच्या शिखरावर असतानाही त्यांनी सिने जगताला टाटा बाय-बाय म्हटलं. अशीच एक अभिनेत्री म्हणजे किमी काटकर (Kimi Katkar). 2 / 8किमी काटकरने नव्वदच्या दशकात इंडस्ट्रीत पाऊल ठेवताच आपला दबदबा निर्माण केला होता. कोणी तिला 'टार्झन गर्ल' तर कोणी तिला 'जुम्मा चुम्मा गर्ल' म्हणतं. किमी काटकरने इंडस्ट्रीत फार काळ काम केले नसेल, पण तिने आपल्या छोट्या कारकीर्दीत प्रेक्षकांच्या मनात घर केले.3 / 8किमी काटकर नाव ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी तिने ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल ठेवले होते आणि खूप नाव कमावले होते. पण, अचानक ही अभिनेत्री मोठ्या पडद्यावरून गायब झाली. 4 / 8वाढलेलं वजन, डोळ्यांखालील काळी वर्तुळ अशा अवस्थेत आता किमी काटकरला ओळखणं देखील कठीण झाले आहे.5 / 8'पत्थर दिल'मध्ये छोटीशी भूमिका साकारणाऱ्या किमीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण, त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती 'अॅडव्हेंचर ऑफ टार्झन'मधून. किमी काटकरनेही या चित्रपटात खूप बोल्ड सीन्स दिले आहेत. यानंतर ती टार्झन गर्ल म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध झाली. 6 / 8याशिवाय एका गाण्यातूनही त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. या गाण्यात ती अमिताभ बच्चनसोबत दिसली होती. हे गाणे होते 'जुम्मा चुम्मा', जे आजपर्यंत लोकांच्या ओठावर रुळताना दिसते. 7 / 8यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर किमीने १९९२ साली सिनेइंडस्ट्रीला अलविदा केला. किमी सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यात व्यस्त आहे. तिने प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि छायाचित्रकार शंतनू शौरीशी लग्न केले आहे.8 / 8मीडिया रिपोर्ट्सनुसार, किमी लग्नानंतर परदेशात शिफ्ट झाली होती. काही वर्षे परदेशात राहिल्यानंतर ती परत भारतात आली आणि आता गोव्यात राहात आहे.