By देवेंद्र जाधव | Updated: March 11, 2026 13:21 IST
1 / 7काही कलाकार अभिनयक्षेत्रात काही जम बसत नाही म्हणून स्पर्धा परीक्षांकडे वळतात. तर काही कलाकार मात्र UPSC/MPSC क्रॅक करुन संधी मिळेल तशी अभिनयाची हौस भागवतात. अशीच एक महिला अधिकारी सध्या बॉलिवूड गाजवत आहे.2 / 7या महिला अधिकारीचं नाव आहे सिमाला प्रसाद. भोपाळमध्ये जन्मलेल्या सिमाला प्रसाद यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी (UPSC) सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली3 / 7२०१० च्या परीक्षेत त्यांनी ५१ वा रँक मिळवला होता. सध्या त्या मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात एसपी (SP) पदावर कार्यरत आहेत. त्यांचे वडील डॉ. भागीरथ प्रसाद हे माजी आयएएस अधिकारी आणि खासदार आहेत, तर आई मेहरुन्निसा परवेज या पद्मश्रीने सन्मानित साहित्यिका आहेत.4 / 7गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या महिला अधिकाऱ्याने २०१६ मध्ये 'अलिफ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २०१९ मध्ये 'नक्काश' या चित्रपटात त्यांनी कुमुद मिश्रा आणि शारिब हाशमी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले.5 / 7सिमाला प्रसाद लवकरच 'द नर्मदा स्टोरी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. सत्य घटनांवर आधारित या सोशल क्राईम थ्रिलरमध्ये त्या 'नर्मदा रैकवार' नावाच्या एका निर्भय तपास अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत6 / 7खाकी वर्दी आणि कॅमेरा या दोन्ही जबाबदाऱ्या सिमाला तितक्याच सक्षमपणे पेलतात. त्यांचे असे मत आहे की, माणसाने स्वतःला एका विशिष्ट चौकटीत अडकवून ठेवू नये7 / 7प्रशासकीय सेवा आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रांत लीलया वावरणाऱ्या सिमाला प्रसाद आज अनेक तरुणांसाठी एक आदर्श बनल्या आहेत.