PICS : दीपक चहरची बहीण मालतीची चित्रपटात होणार धमाकेदार एन्ट्री, फोटो पाहून फिदा व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 14:59 IST
1 / 8क्रिकेटपटू दीपक चहर काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेन्डला स्टेडिअममध्ये प्रपोज करून चर्चेत आला होता. आता दीपक चहरची बहीण चर्चेत आहे. होय, दीपकची बहीण मालती चहर चित्रपटात डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे.2 / 8होय, मालती लवकरच तामिळ सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. विग्नेश शिवन आणि नयनतारा यांच्या प्रॉडक्शनच्या ‘Walking Talking Strawberry Ice Cream’ या तामिळ चित्रपटातून तिचा डेब्यू होतोय.3 / 8मालतीने स्वत: ट्विटर वर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. दीपक चहरची बहीण अॅक्टिंग डेब्यू करणार म्हटल्यावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.4 / 8 मालती चहर पहिल्यांदा 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यात दिसली होती, तेव्हा ती चर्चेत आली होती. चेन्नईच्या विजयावर आनंद साजरा करताना आणि पराभवावर रडताना देखील ती दिसली. साहजिकच यानंतर मालती रातोरात प्रसिद्ध झाली होती.5 / 8मालती ही पेशाने मॉडेल आहे. याआधी अनेक कमर्शिअलमध्ये ती दिसली आहे. letsmarry.com या वेबसीरिजमध्येही ती दिसली होती.6 / 8भाऊ दिपक चहर आणि ड्वेन ब्रावोसोबत ‘रन द वर्ल्ड’ या लोकप्रिय गाण्यावर मालती थिरकताना दिसली होती. त्यावेळीही ती अचानक प्रकाशझोतात आली होती.7 / 8 मालती सॉफ्टवेअर अभियंता असूनही तिने करिअर म्हणून अभिनय आणि मॉडेलिंगची निवड केली आहे. सोशल मीडियावरही तिची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.8 / 8तुम्हाला माहित नसेल पण मालती ‘मिस इंडिया अर्थ 2009’ आणि ‘फेमिना मिस इंडिया 2014’ची सेकंड रनरअप होती. क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा ती भावाला चीअर करताना दिसली आहे.