Join us
Daily Top 2Weekly Top 5

IN PICS : यांना लाज कशी वाटत नाही? त्या ‘अफवा’ ऐकून भडकली इलियाना डिक्रूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 19:01 IST

1 / 8
सोशल मीडियावरच्या अफवा अनेकदा मनस्ताप देणा-या ठरतात. अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिलाही अशाच मनस्तापाला सामोरे जावे लागले. अलीकडे एका मुलाखतीत इलियाना यावर बोलली. तिच्याबद्दल खोट्या बातम्या पेरणा-यांना तिने चांगलेच फैलावर घेतले. अगदी मीडियावरही ती बरसली.
2 / 8
मीडियाला अशा खोट्या बातम्या कोण पुरवतं, असा सवाल तिने केला. कधी काळी इलियाला प्रेग्नंट असल्याच्या, तिने अबॉर्शन केल्याच्या बातम्या माध्यमांत उमटल्या होत्या. यामुळे इलियाना चर्चेत आली होती.
3 / 8
त्यावेळी इलियानाने या बातम्यांवर मौन राखणे पसंत केले होते. मात्र आता ती यावर बोलली.
4 / 8
अशी एखादी बातमी आहे का जी ऐकून तू खूप हसली होतीस? असा प्रश्न या मुलाखतीत तिला करण्यात आला. यावर ती बोलली.
5 / 8
ती म्हणाली, अशा अनेक बातम्या आहेत. माझ्याबद्दलच्याच अनेक बातम्या़ एका बातमीत मी गरोदर आहे आणि अबॉर्शन केलेय, असे म्हटले गेले होते. ती बातमी वाचून मला हे ऐकून हसायला आले होते. शिवाय वाईटही वाटले होते. लोक एखाद्याबद्दल किती आणि काय काय बोलू शकतात. हे खूप विचित्र होते.
6 / 8
स्वत:बद्दलची एक बातमी वाचून तर मला धक्का बसला होता, असे तिने सांगितले़ ही बातमी होती माझ्या मृत्यूची.
7 / 8
याबद्दल इलियाना म्हणाली, एका वेबसाईटवर मी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी होती तर अन्य एका ठिकाणी मी आत्महत्या केली आणि माझा मृत्यू झाला, अशी बातमी होती. माझ्या घरी काम करणा-या बाईने या वृत्ताला दुजोरा दिल्याचा दावाही या बातम्यांमध्ये करण्यात आला होता.
8 / 8
प्रत्यक्षात मी कधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नाही आणि दुसरे म्हणजे माझ्या घरात कोणतीही कामवाली बाई येत नाही. मी जिवंत आहे. मला कळात नाही यांना या मसालावाल्या बातम्या मिळतात कुठून? ुइतकं खोट छापतांना यांना लाज कशी वाटत नाही? असा प्रश्न मला नेहमी पडतो, असेही इलियाना म्हणाली.
टॅग्स :इलियाना डीक्रूज