Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नवरा परत आला तर ठीक नाहीतर...', लग्न झाल्यापासून नवरा आहे लांब अन् राखी सावंतला व्हायचंय आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 16:51 IST

1 / 10
बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. तसेच तिचे सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो नेहमी व्हायरल होताना दिसत असतात.
2 / 10
राखी सावंतने बिग बॉस १४ शोमध्ये आयुष्यातील बरेच खुलासे केले होते. त्यावेळी ती खूप चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने तिला आई व्हायचे असल्याचे एका मुलाखतीत म्हटले आहे.
3 / 10
राखी सावंत हिने एका मुलाखतीत म्हटले की, जर तुम्हाला जास्त वेळ काम करायचे असेल तर, तुम्ही एग्ज फ्रीज करणे ही चांगली कल्पना आहे. स्त्रियांना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागतो ज्यामुळे त्यांना गर्भधारणा करण्यात मोठी अडचण येते.
4 / 10
एका वयानंतर स्त्रीला आई बनणे कठीण जाते. आपल्याला बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ काम करायचे असेल आणि भविष्यात आपण मुलांसाठी एग्ज फ्रीज करु शकतात, असे राखी सावंतने सांगितले.
5 / 10
राखीने पुढे सांगितले की, 'आता मी आई व्हायला तयार आहे. मला आई व्हायचे आहे. आता वेळ आली आहे. कारण मी एग्ज फ्रीजमध्ये ठेवली आहेत. नंतर मी देखील काम करू शकते. जर माझा नवरा आला तर ठीक आहे. नाहीतर भविष्यात मला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल.
6 / 10
राखी सावंतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, तिचे नुकतेच ड्रीम में एन्ट्री हे गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे सुपरहिट ठरले आहे.
7 / 10
हे गाणे सुपरहिट झाल्यावर राखीनेही सेलिब्रेशन केले आहे.
8 / 10
राखी सावंत काही दिवसांपूर्वी इंडियन आयडल १२ या रिएलिटी शोमध्ये गेली होती. तिथे तिने लावणी करून सर्वांचे मन जिंकले होते.
9 / 10
इंडियन आयडल १२ या रिएलिटी शोमध्ये राखीने लावणी करून सर्वांचे मन जिंकले होते.
10 / 10
राखी सावंतचे इंस्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :राखी सावंतबिग बॉसइंडियन आयडॉल