Join us

हृतिक रोशनने अमिशा पटेलसोबत 'कहो ना प्यार है'साठी केलेलं फोटोशूट, २५ वर्षांपूर्वींचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 19:04 IST

1 / 7
'कहो ना प्यार है' सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमानिमित्त हृतिक रोशन आणि अमिशा पटेल यांनी २५ वर्षांपूर्वी केलेलं फोटोशूट व्हायरल झालंय
2 / 7
'कहो ना प्यार है'साठी हृतिक रोशन आणि अमिशा पटेल यांनी रोमँटिक अंदाजात फोटोशूट केलेलं जे चर्चेत होतं.
3 / 7
'कहो ना प्यार है' हा हृतिक आणि अमिशा दोघांचाही पहिला सिनेमा होता. या सिनेमासाठी हृतिक-अमिशाने खास फोटोशूट केलेलं
4 / 7
२००० साली 'कहो ना प्यार है' रिलीज झालेला. त्यावेळी नवखे कलाकार असूनही हृतिक - अमिशा यांनी आत्मविश्वासाने एकमेकांसोबत स्क्रीन शेअर केली
5 / 7
'कहो ना प्यार है' सुपरहिट झाला. परिणामी सिनेमा रिलीज होऊन २५ वर्ष झाले असले तरीही हृतिक-अमिशाची जोडी आजही प्रेक्षकांची फेव्हरेट आहे
6 / 7
'कहो ना प्यार है' २५ वर्षांनंतर थिएटरमध्ये पुन्हा रिलीज होतोय. १० जानेवारी २०२५ ला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे
7 / 7
'कहो ना प्यार है' पुन्हा २५ वर्षांनंतर रिलीज होत असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला आहे. हृतिक-अमिशाला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बघायला त्यांचे चाहते उत्सुक आहेत
टॅग्स :हृतिक रोशनअमिषा पटेलराकेश रोशन