Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिका सोडण्याच्या विचारात; डोनाल्ड ट्रम्प ठरले कारण? म्हणाली- "आम्हाला बाहुलीप्रमाणे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 14:04 IST

1 / 7
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर आणि त्यांच्या निर्णयांवर खूप टीका होताना दिसते. आता एक प्रसिद्ध अभिनेत्री डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अमेरिका सोडण्याच्या विचारात आहे.
2 / 7
ट्वायलाईट या गाजलेल्या सिनेमा फ्रँचायझीमधील क्रिस्टन स्टीवर्टने हा खुलासा केला आहे. क्रिस्टन आता अमेरिका सोडण्याच्या विचारात असूत तिने ट्रम्प यांच्यावर टीकाही केली आहे.
3 / 7
'हॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना आजही स्वतंत्र ओळख दिली जात नाही. आम्हाला अनेकदा बाहुल्यांसारखी (Puppets) वागणूक दिली जाते.'', असं मोठं विधान क्रिस्टनने केलं आहे.
4 / 7
''काय बोलायचे, कसे वागायचे आणि पडद्यावर कसे दिसायचे, हे सर्व पुरुष ठरवतात. अभिनेत्रींची स्वतःची मते अनेकदा दाबून टाकली जातात.'', असाही खुलासा क्रिस्टनने केला आहे.
5 / 7
स्टीवर्टच्या मते, सिनेमा उद्योगात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार आणि आदर मिळण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.
6 / 7
'जेव्हा सत्तेत बसलेले लोकच महिलांच्या हक्कांचा आदर करत नाहीत, तेव्हा समाजात बदल घडणे कठीण होते,' अशा शब्दांत तिने डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध नोंदवला आहे.
7 / 7
अशाप्रकारे क्रिस्टनने राष्ट्राध्यक्षांच्या धोरणांवर आणि त्यांच्या महिलांविषयक दृष्टिकोनावर कडक शब्दांत टीका केली. यामुळे वैतागून क्रिस्टन अमेरिका सोडण्याच्या विचारात आहे.
टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पहॉलिवूडअमेरिका