1 / 7अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे सर्वांना धक्का बसला आहे. या दुर्घटनेमध्ये असंख्य लोकांचा मृत्यू झाला. या मोठ्या अपघातामुळे एक सिनेमा अचानक चर्चेत आला आहे2 / 7या सिनेमाचं नाव आहे 'सोसायटी ऑफ द स्नो'. मूळचा स्पॅनिश भाषेत असलेला हा सिनेमा हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारीत आहे3 / 7१५ डिसेंबर २०२३ ला रिलीज झालेला हा सिनेमा सध्या ओटीटीवर उपलब्ध आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे हा सिनेमा चर्चेत आला असून लोकांना या सिनेमाची उत्सुकता आहे4 / 7या सिनेमाच्या कहाणीबद्दल सांगायचं कर, १९७२ साली उरुग्वेची रग्बी टीम प्रवास करत असताना त्यांच्यासोबत ही घटना घडते. ते ज्या विमानातून प्रवास करतात त्या उरुग्वेयन एअर फोर्स ५७१ या विमानाचा अपघात होतो.5 / 7या विमानात ४५ जण असतात त्यापैकी २९ जण सुरुवातीला वाचतात. पण नंतर त्यातील काही जणांनाही त्यांचा जीव गमवावा लागतो. सिनेमातील प्रत्येक सीन अंगावर येणारा आहे6 / 7जे लोक वाचले असतात ते मृत पावलेल्या व्यक्तींचं मांस खाऊन आयुष्य जगतात. जगण्यासाठी प्रत्येकजण कसा संघर्ष करतो, याची भीषण कहाणी या सिनेमातून दिसतो.7 / 7 'सोसायटी ऑफ द स्नो' हा सिनेमा सध्या नेटफ्लिक्सवर तुम्हाला बघायला मिळेल. IMDB वर या सिनेमाला ७.८ हे रेटिंग आहे.